MSRTC Bus, washim news,  saam tv
महाराष्ट्र

Shivshahi Bus Accident : बसमध्ये 40 प्रवासी, अन् धावत्या बसचा टायर निखळून 200 फूट लांब पडला, पुढे जे घडलं...

Washim Accident News : त्यात मोठी जीवितहानी घडली असती अशी चर्चा घटनास्थळी सुरु आहे.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim Accident News : वाशिमच्या लोणी जवळ रिसोड - संभाजीनगर या शिवशाही बसचा अचानक टायर निघळला. चालत्या बसचा टायर निघळल्याचे चालकाचे लक्षात येताच त्याने तत्परता दाखवत बस एकाबाजूस थांबवली. चालकाच्या प्रसंगावधानाने सुमारे 40 प्रवाशांचा जीव वाचला. (Maharashtra News)

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी - रिसोड वरून संभाजीनगरला (risod sambhajinagar bus accident news) जाण्यासाठी ही बस सकाळी निघाली होती. सुमारे 20 किलोमीटरचा प्रवास करून लोणी पर्यंत बस आली असताना बसचा चालकाच्या बाजूचा पुढील टायर निखळला.

बसचा समोरील उजव्या बाजूचा टायर संपूर्ण अक्सेलचा चुरा होऊन चेक नट कायम असून टायर निसटून शेतात जवळपास दोनशे फूट अंतरावर गेला दुर्घटना घडण्याआधी तीनशे मीटर अंतरावर चालक संतोष खडसे तसेच वाहक देवकर यांना जळाल्याचा वास आल्याने प्रसंगावधानता दाखवत बसचा वेग नियंत्रित केला.

त्यामुळे चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले. ही बस 2 फूट पुढे गेली असती तर रस्त्याच्या कडेच्या बराशित जाऊन समोरील विद्युत पोलवर आदळली असती. त्यात मोठी जीवितहानी घडली असती अशी चर्चा घटनास्थळी सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऑफिसमध्ये घुसला अन् अंदाधुंद गोळीबार, स्वत:वरही झाडल्या गोळ्या, ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: रेव्ह पार्टीचा खरा सूत्रधार कोण? ठाकरेंनी अग्रलेखात थेट 'या' भाजप नेत्याचं नाव घेतलं

Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात राज्यात पावसाचा जोर ओसरणार! | VIDEO

Versova-Madh Bridge: २२ किमीचं अंतर फक्त ५ मिनिटात, वर्सोवा-मढदरम्यान तयार होणार केबल ब्रिज

भयंकर! ट्रेन येताच थेट रुळावर पळत पळत आली तरुणी अन्…, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT