Independent MLA Devendra Bhuyar Saam TV
महाराष्ट्र

शिवसेनेचं नियोजन चुकलं, एक फोन सुद्धा केला नाही - अपक्ष आमदार देवेंद्र भुयार

मी संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसोबत राहून निवडून आलो आहे.

मंगेश मोहिते

नागपूर : मी संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसोबत राहून निवडून आलो आहे, मग मी गद्दारी कशी केली? मी संजय राऊत यांच्या पूर्वीपासून आघाडीसोबत जोडलेला आहे. मी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम करत असून संजय राऊत आणि त्यांचा पक्ष तर विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीसोबत आला असल्याचं वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी केलं आहे.

काल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ज्या अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला, तेच देवेंद्र भुयार अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आज सायंकाळी ४.३० वाजता राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबई येथील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलत असताना भुयार म्हणाले, 'मी विश्वास मताच्या वेळेलाही महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती संजय राऊत यांचा चुकतंय, ते खूप मोठे नेते आहे मात्र असा आरोप करणे योग्य नाही. मी पहिल्या पसंतीचा मत संजय पवार व दुसऱ्या पसंतीचा मत संजय राऊत यांना दिलं. शिवसेनेचं नियोजन चुकलं, शिवसेनेचे उमेदवार मला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केलेला नाही. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या तर त्या प्रमाणे मतदान केलं' असल्याचं स्पष्टीकरण देखील भुयार यांनी दिलं.

तसंच हे सर्व आपण पवारांना भेटून सांगणार आहे. प्रामाणिकपणे मतदान करूनही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार सोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहे. त्यामुळे आमच्या बद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच अपक्षांना एकत्रित येऊन एक भूमिका घ्यावी लागेल. विचार करावा लागेल, हा एकट्या अपक्षावर दाखवलेला अविश्वास नाही तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे. मी भाजपला (BJP) मतदान कधीच करणार नाही असं देखील ते यावेळी म्हणाले.

तसंच मुख्यमंत्री कधीच भेटत नाहीत, अनेक पत्र लिहूनही उत्तर देत नाहीत. हे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आहे. मतदारसंघाची काम आम्ही राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना नाही तर मग काय पंतप्रधान मोदींनी जाऊन सांगणार का असा सवाल करत मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाही ही आमची खंत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT