Uddhav Thackeray Sabha Nashik
Uddhav Thackeray Sabha Nashik  Saam tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray Sabha: उद्धव ठाकरेंची आज नाशिकमध्ये तोफ धडाडणार; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?

Satish Daud

Uddhav Thackeray Sabha Nashik

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने कंबर कसली आहे. निवडणुकीत भाजपसह शिंदे गटाला पराभूत करण्यासाठी नवनवीन रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारीपासून ठाकरे गटाच्या राज्यस्तरिय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दोन दिवसीय राज्यव्यापी अधिवेशन बोलावण्यात आलं असून राज्यभरातील शिवसैनिक या अधिवेशनात सहभागी झाले आहेत. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. (Latest Marathi News)

त्यामुळे या सभेत ते नेमकं काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आज ठाकरे गटाकडून आगामी लोकसभा निवडणुकीचं फुंकले जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) लोकसभेच्या प्रचाराचा नारळ देखील फोडला जाणार आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे सोमवारी दुपारी नाशिक दौऱ्यावर आले होते. उद्धव ठाकरे नाशिकमध्ये येताच शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केली होते. यावेळी आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे तसेच ठाकरे गटातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी ठाकरेंनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेत पूजा केली.

त्यानंतर गोदावरी काठी शिवसैनिकांसह महाआरती देखील केली. आज दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख वक्ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates: मोठा निर्णय! मुंबईतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 3 वाजता घरी सोडण्याचे निर्देश

Powai Lake Overflow : मुंबईकरांना सर्वात मोठा दिलासा, शहराला पाणीपुरवठा करणारा पवई तलाव तुडूंब भरला

ADAI WATERFALL : पनवेलमधील निसर्गरम्य अडाई धबधबा

Recipe: पावसाळ्यात खमंग! मेथी पराठा बनविण्याची सोपी रेसीपी

Thane News: ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पिसे पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड; पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT