Chandrapur News Saam TV
महाराष्ट्र

Chandrapur News: युवासेना शहर प्रमुखाच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; ठाकरे गटाच्या 3 कार्यकर्त्यांना अटक

Crime News: शिवा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर नामक मित्राच्या कार्यालयापाशी त्यांचा मृतदेह आढळला होता.

Ruchika Jadhav

Chandrapur Crime:

चंद्रपूरमधील ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. सदर प्रकरणी ठाकरे गटातीलच अन्य ३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या तिघांची कसून चौकशी करत आहेत.

शिवा वझरकर असं हत्या झालेल्या ठाकरे गटाच्या युवा सेना शहर प्रमुखांचे नाव आहे. गुरुवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडली. शिवा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर नामक मित्राच्या कार्यालयापाशी त्यांचा मृतदेह आढळला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक आणि ३ आरोपी यांच्यात काही दिवसापांसून वैयक्तिक कारणावरून भांडणं सुरू होती. भांडणात मनात राग निर्माण झाल्याने शिवा यांना भेटण्यास बोलावून त्यांची हत्या करण्यात आलीये.

हत्येनंतर शिवा समर्थकांनी या भागात उभ्या असलेल्या जेसीबींची तोडफोड करून संताप व्यक्त केला होता. हत्या केल्यावर तिन्हीही आरोपींनी तेथून पळ काढला. तसेच ते लपून बसले होते. मात्र पोलिसांनी सापळा रचून स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर या 3 कार्यकर्त्यांना पोलिसांनी काल रात्री अटक केलीये. रामनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT