Uddhav Thackeray And Devendra Fadnavis  Saam Tv
महाराष्ट्र

Saamana Editorial: 'तथाकथित विकासाचा चिखल झाला...' नागपूर पुरस्थितीवरुन ठाकरे गटाचे फडणवीस, RSS वर टीकास्त्र

Saamana Editorial On Nagpur Flood: नागपूरमधील पूरपरिस्थिती वरून ठाकरे गटाचा देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि RSS वर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

Gangappa Pujari

Saamana Editorial News:

दोन दिवसांपुर्वी नागपुर शहराला मुसळधार पावसाचा फटका बसला. पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला. या तलावाचे पाणी नागपुरच्या सखल भागात शिरले. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. यावरुन आता राजकीय वर्तुळातही आरोप- प्रत्यारोप सुरू झाली आहे. नागपूरमधील पूरपरिस्थिती वरून ठाकरे गटाचा देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि RSS वर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

सामना अग्रलेखातून टीका....

राज्याची उपराजधानी नागपूरच्या (Nagpur) विकासाच्या वल्गना शनिवारी चार तासांच्या मुसळधार पावसात वाहून गेल्या. नाग नदीला आलेल्या महापुराने पाच जणांचे बळी घेतले. दहा हजारांपेक्षा जास्त बैठी घरे, बंगले, झोपड्या, दुकाने यांचे भयंकर नुकसान झाले. अनेक गाड्या वाहून गेल्या. कमी काळात प्रचंड पाऊस हे या हाहाकाराचे कारण सांगितले जात आहे.

त्यात तथ्य असले तरी नागपूरच्या विकासाच्या गप्पा शेवटी 'गोलगप्पा'च ठरल्या या वस्तुस्थितीचे काय? नागपूरच्या विकासाचा ठेका आणि मक्ता ज्या स्वयंघोषित ठेकेदारांकडे वर्षानुवर्षे आहे, त्यांच्याकडे या प्रश्नाचे काय उत्तर आहे? ते नसल्यानेच मग आक्रोश करणाऱ्या पूरग्रस्तांना हाताने धरून बाजूला करण्याची वेळ आज तुमच्यावर आली.

तथाकथित विकासाचा चिखल..

एरवी मुसळधार पावसाने मुंबईत (Mumbai) पाणी साचले की, शिवसेनेकडे बोट दाखविणारे तुम्हीच आहात ना? मग आता ज्या नाग नदीतून बोटी चालविण्याचे स्वप्न तुम्ही दाखविले त्याच नाग नदीत हजारो कुटुंबांची घरेदारे, संसार, गाडय़ा वाहून जाताना पाहण्याची वेळ नागपूरकरांवर का आली? त्यासाठी कोणाकडे बोट दाखवायचे? याच नाग नदीच्या महापुरात तुमच्या तथाकथित विकासाचा आज चिखल झाला आहे आणि त्या चिखलात सामान्य नागपूरकर आपले किडुकमिडुक शोधत वणवण फिरत आहेत. त्याचे काय प्रायश्चित्त तुम्ही घेणार आहात?

विकासाचे मॉडेल महापुरात वाहून गेले....

मुंबईला जशी भौगोलिक मर्यादा आणि सागरी निर्बंध आहेत, दाटीवाटीची लोकवस्ती आहे तसे नागपूरबाबत नाही. तरीही तुमचे तेथील विकासाचे मॉडेल शनिवारच्या महापुरात वाहून गेले. केवळ चार तासांच्या पावसात (Nagpur Rain) नागपूर बुडाले. त्यात तुमच्या विकासाच्या थापा गटांगळ्या खाताना संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. या महापुराने नागपूरच्या स्वयंघोषित ठेकेदारांचा मुखवटाही गळून पडला.

नागपूर कोणी बुडवले?

आता तरी ते आणि त्यांचा 'परिवार' काही 'चिंतन' करणार आहेत का? मुंबई तुंबली म्हणून शिवसेनेकडे (Shivsena) बोट दाखविणाऱ्यांचे आता नागपूरचे 'तुंबापूर' झाले यावर काय म्हणणे आहे? नागपूर कोणी बुडवले? असा प्रश्न नागपूरकर विचारत आहेत. त्याचे आधी उत्तर आणि मगच नागपूरच्या विकासाच्या वल्गना करा... अशा शब्दात सामनामधून टीका करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Shravan Somwar: श्रावणाचा पहिला सोमवार: महादेवाला अर्पण करा या गोष्टी

SCROLL FOR NEXT