शिवसेनेत फूट फडल्यानंतर राज्याचं राजकारण बदललं आहे. राज्यात सत्तास्थानावर पोहोचत शिंदे गटाने नवीन चूल मांडली आहे. आता दोन्ही गट शहरातील पक्षाच्या शाखा, कार्यालयावर दावा ठोकू लागले आहेत. यामुळे राज्यातील काही भागात कार्यकर्त्यांमध्ये वादविवादही पाहायला मिळत आहे. असंच एक प्रकरण सांगलीतून समोर आलं आहे. सांगलीत पक्षाच्या कार्यालयावरून दोन्ही गट एकमेकांविरोधात भिडले. या वादामुळे परिसरातील राजकीय वातावरण तापलं आहे. (Latest Marathi News)
सांगलीच्या मिरजेत ठाकरे आणि शिंदे गटाचे शिवसैनिक एकमेकांना भिडले आहेत. शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला आहे. यातून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुकी झाल्याची प्रकार समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
शहरातील किल्ला भाग जुना या ठिकाणी असणारी जागा 1989 साली पटवर्धन सरकार यांनी मिरज शहर शिवसेनेला भाडेतत्त्वावर दिली होती. उताऱ्यावर शिवसेना शहर प्रमुख म्हणून नोंद आहे. या उताऱ्याच्या आधारे उद्धव ठाकरे शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी जागेवर हक्कअसल्याचा दावा केला. त्यांनी पत्र्याचे शेड उभे करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जनसंपर्क कार्यालय उघडून काम सुरू केले.
यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख किरण रजपूत यांनीही या जागेवर हक्क असल्याचा दावा केला. त्यांनी पत्र्याचे शेड काढण्यासाठी महापालिका प्रशासनाला तक्रार दिली होती. त्यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाकडून सदर जागेच्या ठिकाणी धाव घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे आणि किरण सिंह रजपूत यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. एकामेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.
दोन्ही गटाने जागेवर हक्क सांगितल्याने महापालिका प्रशासनाची धावपळ उडाली. गणेश उत्सवकाळामध्ये सुद्धा शिवसेना कमानीच्या जागेवरून वाद उफाळून आला होता. आता पुन्हा जागेवरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.