Sanjay Gaikwad-Nitin Gadkari Saam TV
महाराष्ट्र

Political News : 'कधी कधी ते चक्कर येऊन पडतात...', युतीबाबतच्या वक्तव्यावरुन शिंदे गटाच्या आमदाराची नितीन गडकरींवर टीका

Sanjay Gaikwad on Nitin Gadkari : नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

शिवसेना-भाजप युतीबाबत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण तापलं आहे. सध्याची शिवसेना-भाजपची युती म्हणजे राजकीय तडजोड असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. नितीन गडकरी यांच्या या वक्तव्यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. कधी कधी भाषण करताना ते (नितीन गडकरी) चक्कर येऊन पडतात, त्यामुळे ते विसरले असतील की भाजपा सेनाची युती आहे. त्यांना माहिती आहे की राज्यात शिंदे यांची शिवसेना खरी शिवसेना म्हणून ओळखली जाते. कारण त्यांना धनुष्यबाण आणि पक्षाची मान्यता मिळाली आहे, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं.

आमच्याकडे ओरिजनल सैनिक

संजय गायकवाड यांनी यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. परंपरेच्या विचारांचा मेळावा हा आझाद मैदानावरच आहे. उद्धव ठाकरे यांचा मेळावा जिथे आहे तिथे समाजवादी पक्ष, देशातले देशद्रोही पक्ष, ज्यांनी दहशतवाद्यांचे समर्थन केले, काँग्रेस, राष्ट्रवादी, यांचे विचारांचे लोक जमतील. चायनीज माल इकडे नाही इकडे ओरिजनल सैनिक आहे. (Latest Marathi News)

उद्धव साहेब काय विचार मांडणार?

भारतीय माल आमच्याकडे आहे. तिकडे चायनीजपेक्षा पलीकडचा माल आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे सोने हे आझाद मैदानावर लुटायला मिळेल. उद्धव साहेब काय विचार मांडणार? समाजवादी पार्टीच्या विचारांचे भाषण तिकडे मांडणार आहे का? असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT