Uddhav Thackeray vs Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde: एक पत्र आलं अन् ५० कोटी मागितले; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप; नेमकं काय म्हणाले?

CM Eknath Shinde On Uddhav Thackeray: "तुम्ही खिचडीत पैसे खाले, डेडबाॅडी बॅगमध्ये पैसे खाल्ले. कुठे कोण पैसे खायचे ते सर्व बाहेर येईल, तुम्ही फेसबुकवर खेळायचा हा एकनाथ शिंदे फेस टू फेस खेळायचा.." असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

Gangappa Pujari

सुरज सावंत, प्रतिनिधी|ता. १७ फेब्रुवारी २०२४

CM Eknath Shinde Speech:

कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेते तसेच कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे दिसतात तसे नाही, त्याच्या मागे अनेक चेहरे आहेत. सत्तेच्या एका खुर्चीपाई यांनी बेईमानी केली, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"एक सामान्य मुलगा मुख्यमंत्री झाल्याचा द्वेश आहे. धनधाडग्यांनीच मुख्यमंत्री व्हायचं का? परिवार वाद याला आपण बगल दिली पाहिजे. मी डाओसला गेला तरी दुख, गावी जातो तरी हॅलिकोप्टरने जातो म्हणून टिका करतात. अरे हॅलिकाॅप्टरने जातो शेती करतो, तुमच्यासारखे फोटो नाही काढत. इरशाळ वाडीला गेलो तरी दु:ख, मुंबईत झाडू मरला तरी दुखं. पंतप्रधानांना भेटलो तरी दुख, मग मी काय करू, घरी बसू तुमच्यासारखं?" असा खोचक सवाल एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विचारला.

ठाकरेंवर गंभीर आरोप..

"CM म्हणजे चिफ मिनिस्टर नाही तर काॅमन मॅन. दाढीला हलक्यात घेऊ नका, दाडीला जनतेची नाळ कळते, मी सिंमबाॅलिक बोलतो जास्त बोलण्याची संधी मला देऊ नका. कोविडमध्ये फेसबुक करणारे कोण, पीपीई किट घालणारे कोण हे जनतेने पाहिलं. मी लोकांना भेटायचो, तुम्ही खिचडीत पैसे खाले, डेडबाॅडी बॅगमध्ये पैसे खाल्ले. कुठे कोण पैसे खायचे ते सर्व बाहेर येईल, तुम्ही फेसबुकवर खेळायचा हा एकनाथ शिंदे फेस टू फेस खेळायचा.. असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

५० कोटी मागितले..

"धनुष्यबाण आपल्याला मिळाल्यानंतर एक पत्र आलं. आम्हाला पक्षाच्या खात्यातील ५० कोटी हवेत. मी क्षणाचाही विचार न करता देऊन टाका. ५० खोकेंचे आरोप करता आणि ५० कोटी मागता. यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी. तुमच्या वरती संकटं ही या एकनाथ शिंदेने अंगावर घेतली. बोलायच्या वेळी मी बोलीन," असा गंभीर आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

SCROLL FOR NEXT