Shiv Sena, Sanjay Raut/file  SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Raut : डॉ. आंबेडकर हे महाराष्ट्राचेच सुपुत्र; आम्हाला काय अक्कल शिकवताय? : संजय राऊत

Sanjay Raut News : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं विधान संजय राऊत यांनी केल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.

साम ब्युरो

Sanjay Raut On Dr. Babasaheb Ambedkar Birth Place : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं वक्तव्य शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपनं या वक्तव्यावरून संजय राऊतांवर टीका केली होती. त्या टीकेला आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का हा माझा प्रश्न आहे, असा प्रतिसवाल यावेळी राऊत यांनी स्पष्टीकरण देताना केला.

राज्यात महापुरुषांचा अवमान करणारी वक्तव्ये राजकीय पक्षांच्या काही नेत्यांकडून वारंवार केली जात आहेत. यावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. त्याचवेळी डॉ. बाबासाहेबांचा जन्म हा महाराष्ट्रात झाल्याचं विधान करून संजय राऊत यांनी नव्या वादाला तोंड फोडलं. यावरून भाजप नेते नितेश राणे आणि चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्यानंतर आज, शुक्रवारी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण देतानाच, भाजप नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)

काय म्हणाले संजय राऊत?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाल्याचं विधान केल्यानंतर संजय राऊत यांच्यावर टीका झाली. त्या टीकेला उत्तर देताना राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र नाहीत का? हा माझा प्रश्न आहे. घटनाकार हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. या नात्याने ते आमचे आहेत असं मी म्हटलं. त्यांचा जन्म या देशातच झाला. १८९१ मध्ये महूमध्ये त्यांचा जन्म झाला. तेव्हा मध्यप्रदेश नव्हतं. महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली, बिहारची कधी झाली? याचा अभ्यास त्यांनी करायचा आहे. त्यांच्या जन्मावेळी कोणतंही राज्य नव्हतं. एकच मुंबई प्रांत होता मोठा. डॉ. आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत हे जर त्यांना कळत नसेल तर आजही त्यांच्या काय भावना आहेत ते यावरून दिसतं, असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut)

'भाजपला अभिमान नाही'

यावेळी संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आहेत. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांना याचा अभिमान नाही. भाजपमध्ये काय बुद्धीचे लोक घेतलेत ते कळतंय. वारंवार छत्रपती शिवरायांचा, आंबेडकर-फुलेंचा अपमान करतात आणि आम्हाला अक्कल शिकवतात. डॉ. बाबासाहेबांचा जन्म कधी झाला हे जर माहीत नसेल तर काय म्हणणार. ते या देशात जन्मले हे देशाचे भाग्य आहे. ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, हे त्याहीपेक्षा मोठं भाग्य आहे, असंही राऊत म्हणाले.

'संजय राऊत यांनी अभ्यास करून बोलावे'

संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच, भाजप आमदार प्रताप अडसड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील महू गावी झाला आहे. संजय राऊत यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी अभ्यास न करता महापुरुषांना राजकीय वादात ओढणे हे चुकीचे आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. येणाऱ्या काळात तरी महापुरुषांवर बोलताना किमान विचार करावा, अशी अपेक्षा देखील प्रताप अडसड यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Fort : शिवरायांच्या स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार, 'रायगड'बद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

Maharashtra News Live Update: मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले

Gaurav More Wedding : 'फिल्टरपाड्याचा बच्चन' चढला बोहल्यावर; गौरव मोरेने गुपचूप बांधली लग्नगाठ, बायकोसोबतचा पहिला फोटो आला समोर

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट; आणखी एक महिला अधिकारी रडारवर, प्रशासनात खळबळ

Jio Plan : जिओचा भन्नाट रिचार्ज प्लॅन, 329 रुपयांत होणार मोठा फायदा

SCROLL FOR NEXT