Rahul Narwekar May Get Cabinet Berth Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल? राहुल नार्वेकरांना मिळणार मोठी जबाबदारी? म्हणाले...

Saamana Predicts Massive Reshuffle In Government: सामनाने आठ मंत्र्यांना नारळ मिळणार असल्याचा दावा केल्यानंतर चर्चेला उधाण. राहुल नार्वेकर मंत्रिपदासाठी चर्चेत, तर मुनगंटीवार अध्यक्षपदासाठी संभाव्य नाव.

Bhagyashree Kamble

महायुती सरकारमधील तब्बल ८ मंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचा सनसनाटी दावा सामना या दैनिकातून करण्यात आला. दैनिकात केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. सरकारमध्ये खरोखरंच सर्व काही आलबेल आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. सामनातील लेखात म्हटलंय की, लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे. सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, त्यांच्या जागी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात येईल, असा दावा देखील करण्यात आला आहे.

यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. 'माध्यमांमधील बातम्यांवर विश्वास नाही. पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास आहे. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी तयार आहे. पक्षाची जी इच्छा असेल, तीच इच्छा माझी इच्छा असेल', असं त्यांनी म्हटलं आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर आनंद होईल का? हा प्रश्न विचारले असता त्यांनी, 'मला देतील ती जबाबदारी पार पाडणार आहे', असंही नार्वेकर म्हणालेत.

'विधानसभा अध्यक्ष असेन किंवा मंत्री, शेवटी जनतेसाठीच काम करायचं आहे', असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, विधानसभा अध्यक्ष म्हणून आपण क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. अधिवेशनामध्ये आतापर्यंत १५२ लक्षवेधी मांडण्यात आल्या आहेत. मी माझ्या पदावर चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. इतर जबाबदारी मिळाली तर, ती सुद्धा योग्य पार पाडू. मी माझ्या कामाबाबतीत संतुष्ट आहे. जेव्हा केव्हा मंत्रिपदाची माळ पडेल. त्यावेळी बघू, असंही यावेळी नार्वेकर म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yuvraj Singh : वडिलांना साधा कुर्ता घेत नाही पण 'त्या' बाबाला १५ लाखांचं घड्याळ देतो, युवराज सिंगवर गंभीर आरोप

Election Roll Controversy in Maharashtra: बुलढाण्यात 1 लाख बोगस मतदार?मतदारयाद्यांमध्ये घोळ, आयोग करतंय काय?

Maharashtra Live News Update: मालेगावात किराणा दुकानातून गांजाची विक्री

Gunratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंना मारहाण, शरीराला अनेक फ्रॅक्चर?

BMC Election : महायुतीच्या जागावाटपाआधीच रामदास आठवलेंनी बॉम्ब फोडला; मुंबईतून दोन उमेदवारांची केली घोषणा

SCROLL FOR NEXT