Shivsena replied to central minister Nararayan rane  Saam Tv
महाराष्ट्र

तुम्ही नरेंद्र मोदींची लाज काढत आहात; शिवसेनेचे नारायण राणेंना खणखणीत प्रत्युत्तर

Narayan Rane News : पत्रकार परिषदेतील नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुंबईच्या बीकेसीमधील सभेत शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अयोध्या, बाबरी मशीद, हिदुंत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुफान बरसले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रविवारच्या सभेत यांनी उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला. आता उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते, अशा शब्दात राणेंनी टीका केली होती. राणेंच्या टीकेला शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे (manisha kayande) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ( Shivsena replied to central minister Nararayan rane )

हे देखील पाहा -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यानंतर शिवसेनेच्या विधान परिषदेच्या आमदार आणि प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी नारायण राणे यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. कायंदे म्हणाल्या, 'नारायण राणे यांना अजूनही लक्षात येत नाही की ते आता केंद्रीय मंत्री आहेत. त्यांना ते कोकणातल्या गावातील एखादा सरपंच आहे, असे वाटत असावे. तुम्ही केंद्रीय मंत्री आहात. तुम्ही नरेंद्र मोदींची लाज काढत आहात. मोदींच्या मंत्रिमंडळात तुम्हाला घेतलंय तर तुमची पात्रता सिद्ध करा. मातोश्री, उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीय यांच्याबद्दल वाईट बोलल्या शिवाय यांचा दिवस जात नाही, अशा शब्दात कांयदे यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या या प्रत्युत्तराला नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबीयाकडून काय उत्तर मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नारायण राणे काय म्हणाले होते ?

दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर पत्रकार परिषदेत जोरदार प्रहार केला होता. राणे म्हणाले होते, 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणायाला लाज वाटते. असंख्य मुख्यमंत्री झाले त्यांनी राज्याची प्रतिमा वाढवायचे काम केले. हा इतिहास असताना परवाचे शिवसेनेचे भाषण ऐकून वाईट वाटलं. १४ तारखेला फार मोठा गवगवा करून जाहीर सभा घेतली. मुख्यमंत्री पदावर असताना जाहिरातबाजी करून सभा घ्यावी लागली. देशभरातील जनतेने सभा किती भरली आणि खर्च किती केला, याचा अंदाज घेतला असावा, अशी खणखणीत टीका उद्धव ठाकरेंवर केली होती.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: बच्चू कडूंचा महाएल्गार मोर्चा, नागपूरात चक्काजाम, प्रकाश आंबेडकरांचा खोचक टोला

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT