Uddhav Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : 'भाजपमध्ये चंपी मालीश होते'; उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

भाजपमध्ये प्रवेश केल्यावर चंपी मालीश होते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार निशाणा साधला

संजय डाफ

Uddhav Thackeray News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या बैठकीत ठाकरे यांनी सत्ताधाराऱ्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर चंपी मालीश होते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यावर जोरदार निशाणा साधला. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, 'ज्याला शत्रू नाही, तो कसला मर्द. माझ्या वडिलांचं नाव चोरत आहेत. पक्षाचं नाव, धनुष्यबाण चोरत आहेत. सामन्याला पुढे या मग सांगतो. आम्ही काय करतो. बाळासाहेब ठाकरे यांचे शहरात बॅनर आहेत. ते फोटो मी काढले आहेत'.

'आपण तर घोटाळे काढूच, पण टाचणी भाजप तर लावत नाही ना, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तर महाराष्ट्रात मध्यावधी लागली, तर हे तोतये भाजपच्या जीवावर लढणार का? असाही सवाल त्यांनी केला.

' आम्ही रोज बॉम्ब फोडत आहोत. किती बॉम्ब फोडायचे, हे सर्व घोटाळेबाज घोटाळ्यापासून वाचण्यासाठी तिकडे गेले काय? भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन देशमुख म्हणाले होते, आता छान झोप येते. भाजपमध्ये गेल्यावर चंपी मालीश होते, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भावना चांगली आहे, पण आजूबाजूचे लोक प्रामाणिक हवे ना. आपण रात्री पळून काही करत नाही. दिवसा ढवळ्या करतो. मला किंमत नाही, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा आहे. मी म्हणजे शून्य आहे, मी त्याच नम्र भावनेतून काम करतो, असेही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले.

'संजय राऊत यांना सोन्याचं ताट घेऊन रांगोळी काढून बोलावले. पण ते गेले नाही. युतीमध्ये विदर्भावर लक्ष दिले नाही. पण आता नाही. आता आम्ही विदर्भात ताकद वाढवू. शिवसेना म्हणजे गद्दार नाही हा विचार आहे. तुम्ही जोपर्यंत सोबत आहात, तोपर्यंत मी संपू शकत नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनम वांगचुक यांची हॉस्पिटलमधून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मै अभी..; VIDEO

Maharashtra News Live Update: चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्याला थेट साई समाधीवर बसवले.

दिल्लीतील लाठीचार्जविरोधात विरोधक आक्रमक, संसदेत काळे कपडे घालून विरोधकांकडून निषेध

दिल्लीतील पोलिसांनी लाज आणली, जंतरमंतरवर खाकीतील रक्षक की भक्षक?

शिंदे गटाचा काँग्रेसला दे धक्का! बड्या नेत्यानं सोडली पक्षाची साथ, शिवसेनेत घेतला प्रवेश

SCROLL FOR NEXT