Raj Thackeray  Saam Tv
महाराष्ट्र

मनसे मविआत जाणार? खासदाराच्या वक्तव्याने राजकारण तापलं, राज ठाकरे काँग्रेसबद्दल काय म्हणाले?

Raj Thackeray Joining Maha Vikas Aghadi: मनसेचा महाविकास आघाडीत समावेश करण्याची इच्छा. खासदार संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Bhagyashree Kamble

  • खासदार संजय राऊतांचा मोठा दावा.

  • मनसे पक्षाचा महाविकास आघाडीत समावेश करण्याची इच्छा

  • राऊत यांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ.

मराठी अस्मितेसाठी ५ जुलै रोजी ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर, दोन्ही नेत्यांमध्ये युती होणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून आणि सामान्य वर्गातून वारंवार विचारण्यात येत आहे. मात्र, अद्याप तरी दोन्ही नेत्यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, दोघांनीही प्रसार माध्यमांशी चर्चा करताना अनेकदा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

वारंवार भेटीगाठी होत असल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढवणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. 'काँग्रेसला सोबत घ्यावं, अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे', असं राऊत म्हणाले. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

'काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा राज ठाकरेंची इच्छा आहे', असं राऊत म्हणाले. यामुळे महाविकास आघाडीतील संभाव्य विस्ताराबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. 'काँग्रेसला सोबत घ्यावं, अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे. त्यांची ही भूमिका आहे. कारण महाराष्ट्रात प्रत्येकपक्षाचं वेगळं स्थान आहे. जसं शिवसेना आणि मनसेचं आहे'.

'शरद पवार यांच्या पक्षाचं देखील महाराष्ट्रात वेगळं स्थान आहे. तसेच काँग्रेस देखील महाराष्ट्रातील महत्वाचा पक्ष आहे', असं राऊत म्हणाले. 'महाविकास आघाडीत नवीन घटक यायचा असेल तर, यासाठी नक्कीच एकत्र बसून चर्चा करावी लागेल. असं माझं मत आहे. काँग्रेसचा निर्णय हे दिल्लीतून होईल. आम्ही बाकी राज्यात आहोत'.

'उद्या सर्वपक्षीय नेते निवडणुक आयोगाकडे जाणार आहेत. उद्या घेण्यात येणाऱ्या शिष्टमंडाळाच्या बैठकीत मनसे प्रमुख राज ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देखील सामील होतील', असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aneet padda: सैयारा फेम अनित पड्डाचा पहिला रॅम्प वॉक; लॅक्मे फॅशन वीकच्या फिनालेची बनली शोस्टॉपर, पाहा VIDEO

Prajakta Mali Farmhouse Photo: प्राजक्ता माळीचं फार्महाऊस कशासाठी प्रसिद्ध? पाहा इनसाईड फोटो

Devendra Fadnavis: जिथे शक्य तिथे युती, नाहीतर समोरासमोर लढू; आगामी निवडणुकीवर CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य|VIDEO

'नाहीतर डेडबॉडी सिव्हिलला भेटेल'; भाई, नानानंतर आता तरुणींची सोशल मीडियावर 'ताईगिरी'; नाशिक पोलिसांकडून कायद्याचा दणका

Shegaon Crime : तरुणाला गाडीत डांबून बेदम मारहाण; शेगाव पोलिसांनी भाईगिरी उतरविली, परिसरातून काढली धिंड

SCROLL FOR NEXT