Nashik News  Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : खासदार संजय राऊतांच्या बॉडीगार्डची दादागिरी; भररस्त्यात रिक्षाचालकाला मारहाण

Sanjay Raut Bodygaurd News : रिक्षाचा धक्का ताफ्यातील एका वाहनाला लागला होता.

अभिजीत सोनावणे

Nashik Latest News :

नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने आज ड्रग्सविरोधात विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. खासदार संजय यांच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. संजय राऊतांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान त्यांच्या बॉडीगार्डची दादागिरी समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संजय राऊत यांच्या वाहनांचा ताफा रस्त्याने जात असताना एका रिक्षाचा धक्का ताफ्यातील एका वाहनाला लागला. यावेळी संतापलेल्या संजय राऊत यांच्या बॉडीगार्डने रिक्षा चालकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. (Latest Marathi News)

संजय राऊतांचा निशाणा

ड्रग्सविरोधातील मोर्चानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं. गुजरातमधून ड्रग्स नाशिकपर्यंत पोहोचतं. याला कोण जबाबदार आहे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

तुमच्या दोन मंत्र्यांनी आत्तापर्यंत या ड्रग्जच्या व्यापारातून किती खोके सरकारमधील मंत्र्यांना दिले आहेत. शिवसेनेचं सरकार पाडण्यासाठी या ड्रग्ज माफियांकडून किती पैसा तुम्हाला मिळाला हा प्रश्न आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dreams Fact : रात्री पडलेलं स्वप्न सकाळी आठवतच नाही? समोर आलं थक्क करणारं कारण

Mumbai Crime: मुंबई हादरली! ९ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, ६ जणांकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल

Skin Care: चेहरा ड्राय झालाय आणि ओपन पोर्स वाढलेत? मग, चेहऱ्यावर रोज स्प्रे करा हे घरी तयार केलेले फेस मिस्ट

Maharashtra News Live Update: पोलादपुर महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 16 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार

TET Exam Scam: टीईटी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नामांकित पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT