Rane Vs Shivsena: राणे फुकाच्या वल्गना करु नका- वैभव नाईकांचे आव्हान - Saam TV
महाराष्ट्र

Rane Vs Shivsena: राणे फुकाच्या वल्गना करु नका- वैभव नाईकांचे आव्हान

राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले. त्याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे

साम टिव्ही

(विनायक वंजारे)

सिंधुदुर्ग : "सुशांतसिंग प्रकरणात सीबीआयने राणेंना बोलवून घ्यायला हवं, जर त्यांच्याकडे पुरावे असतील ते घेऊन सीबीआयने कारवाई करावी. राणे दिल्लीत असतात त्यांनी सीबीआय कार्यालयात जाऊन नावं द्यावीत. राणेंकडे जर कोणाचे कारनामे असतील तर ते त्यांनी बाहेर काढावे, फुकटच्या वलग्ना करू नयेत, फुकाच्या धमकी देऊ नयेत," अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आव्हान दिले आहे. (Shivsena MLA Vaibhav Naik Challenges Narayan Rane)

राणे (Narayan Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले. त्याला नाईक यांनी प्रत्युत्तर दिले आहे. "केंद्रीयमंत्री झाल्यापासून गेल्या वर्षभरात नारायण राणेंनी शिवसेनेला संपवणार अशा अनेक वलग्ना केल्या होत्या. मात्र शिवसेनेचे ते काहीही करू शकले नाहीत त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले असून ते शिवसेनेवर (Shivsena) आरोप करत आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंना अटक होऊन पोलीस कोठडी झाली तेव्हापासून राणे वैफल्यग्रस्त झाले आहेत,'' असे नाईक म्हणाले. नितेश राणे हे कलाकार आहेत की आरोपी आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे, अशीही टिपण्णी नाईक यांनी केली.

काल राणेंनी सांगितलं, ईडीची (ED) नोटीस येणार आहे आज नोटीस कुठे गेली?आज दुसराच विषय त्यांनी घेतला. लोकांमध्ये चर्चेत येण्यासाठी राणे काहीतरी आरोप करत आहेत, असेही नाईक म्हणाले. राणेंचा बंगला योग्य पध्दतीने असेल तर कारवाई होणार नाही. मुंबई महापालिकेची लीगल प्रोसिजर चालू आहे, असेही नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

ते पुढे म्हणाले, "शिवसेना हा मराठी माणसांसाठीच पक्ष आहे. आज राणे कोणाची चापलुसगीरी करता आहेत?किरीट सोमय्या सारख्या मराठीद्वेष्ठ्याची ते बाजू घेत आहेत. लोढांसारख्या मुंबईतल्या अमराठी माणसाची राणे बाजू घेत आहेत. त्यामुळे राणेंना मराठी माणसाबद्दल बोलण्याचा अधिकार राहिला नाही. राणेंच्या आरोपाकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेना लक्ष देण्याची गरज नाही. अशा आरोपांकडे शिवसेना ही लक्ष देणार नाही,''

''राणेंनी मर्डर बद्दल अनेक दाखले दिले त्यांना मर्डर बद्दल जास्त माहिती आहे. माझी सरकारला विनंती आहे, मर्डरची आणखी अनेक प्रकरणे उघडता येतील. अंकुश राणे, मंचेकर, गोवेकर ही सर्व प्रकरणे सरकारने उघडली पाहिजेत. त्यांच्या मागे कोण आहे हे बघितलं पाहिजे अशी माझी सरकारकडे मागणी आहे,'' असेही नाईक म्हणाले.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

Maharashtra Live News Update: गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग करणारे अखेर अटकेत

Wednesday Horoscope : मेष राशीसाठी संकष्ठीला लाभ, या राशींच्या नव्या संकल्पना यशस्वी होणार

Janhvi Kapoor: नवरी नटली! जान्हवी कपूरचा नवा ब्रायडल लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT