Ajit Pawar
Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar News : अजित पवारांचं ठरलंय; घेतलेला निर्णय ते कधीच बदलत नाहीत, संजय शिरसाटांचं सूचक वक्तव्य

साम टिव्ही ब्युरो

Chhatrapati Sambhajingar: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार लवकरच भाजपसोबत जातील अशा चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. मात्र आपण आयुष्यभर राष्ट्रवादीसोबत राहणार असलस्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. मात्र स्पष्टीकरणानंतरही या चर्चा अजित पवारांचा पिछा सोडताना दिसत नाहीत. कारण अजित पवारांचं ठरलं आहे, ते ठरवतात ते करतात, असं सूचक वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे.

अजित पवार यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल. त्यांना आजच्या वज्रमुठ सभेत खुर्ची आहे की नाही माहित नाही. ते आले तर काय बोलणार माहित नाही. मात्र ते मनापासून सभेत नसतील. सभेत ते शरीराने असतील पण मनातून कुठे असतील ते येत्या 4 दिवसात सगळ्यांना दिसेल. (Latest Marathi News)

अजित दादा सगळे विषय हसून खेळून टोलवतात आहे, याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे, ते 100 टक्के निर्णय घेतील. अजित पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ते आपला घेतलाल निर्णय कधीच बदलत नाहीत. थोडे दिवस थांबा सगळं कळेल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. (Political News)

मुंबईतील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेवर बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं की, यापूर्वी त्या मैदानावर बाळासाहेबांनी सभा घेतल्या आहेत. त्या सभासोबत आजची सभेची बरोबरी करता येणार नाही.

तीन पक्ष एकत्र येऊन आज गर्दी करतील आणि आम्हीसोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहे. सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे ते कळत नाही. सभेमुळे वातावरण बदलते हा समाज चुकीचा आहे.त्यामुळं फार लक्ष द्यायची गरज नाही, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhurani Gokhale : ‘आई कुठे काय करते’तल्या ‘अरुंधती’चं निस्सिम सौंदर्य

PM Modi Property: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या संपत्तीत किती झाली वाढ? जाणून घ्या

DC vs LSG: दिल्लीच्या विजयाचा राजस्थान अन् बंगळुरूत जल्लोष! लखनऊच्या पराभवाने RCB चा प्लेऑफचा मार्ग मोकळा

Protein Supplement : प्रोटीन सप्लिमेंट आरोग्यासाठी घातक?; प्रोटीन सप्लिमेंटमुळे किडनी विकार?

Tabu : उतरत्या वयातही तबूच्या सौंदर्याची जादू

SCROLL FOR NEXT