Sushma Andhare Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare : सुषमा अंधारेंवर विभक्त पतीचे सर्वात गंभीर आरोप; वैजनाथ वाघमारे नेमकं काय म्हणाले?

Political News : रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी 25 लाख रुपये घेतल्याचे म्हणाले.

विनोद जिरे

Beed News : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यभरातील कला केंद्र चालक सुषमा अंधारे यांच्या संपर्कात असून पोलीस कारवाई होऊ नये, यासाठी मदत करण्याची गळ घालतात.

या ठिकाणी चालणाऱ्या गैर प्रकारांना सुषमा अंधारे यांचे पाठबळ असून यासाठी त्या टक्केवारी घेतात. या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी वैजनाथ वाघमारे यांनी केला.

केज येथे शिवसेनेचे  उद्धव ठाकरे गटाचे हकालपट्टी करण्यात आलेले जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या भागीदारीत चालवल्या जाणाऱ्या कला केंद्रावर 2 दिवसापूर्वी पोलिसांनी धाड टाकली होती. या ठिकाणी अल्पवयीन मुलींचे शोषण केले जात असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर वैजनाथ वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी रत्नाकर शिंदे यांना जिल्हाप्रमुख करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी 25 लाख रुपये घेतल्याचे म्हणाले. तसेच कला केंद्र चालव मी आहे, पोलीस कारवाई होऊ देत नाही, असे म्हणत पाठबळही दिले. यामुळेच रत्नाकर शिंदे हे बळीचा बकरा बनल्याचे वाघमारे यांनी यावेळी म्हटले. (Political News)

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सुषमा अंधारे यांचे मोठे वजन निर्माण झाले आहे. परंतु कला केंद्राच्या माध्यमातून चालणाऱ्या गैरप्रकारांना पाठबळ देणाऱ्या अशा महिलेची पक्षातून ठाकरेंनी हाकालपट्टी करावी , अशी मागणी देखील वाघमारे यांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: राजधानी पुन्हा हादरली! इन्स्टावरील मित्राने रचलं भयानक कांड, महिला डॉक्टरवर बलात्कार

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! हे काम कराच, अन्यथा मिळणार नाही पीएम किसानचे ₹२०००

मर्यादा ओलांडल्या! भाजप नेत्याने शेतकर्‍याला कारखाली चिरडून मारले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

Maharashtra Live News Update: सुट्ट्या संपल्या, बॅक टू वर्क! पुण्यातील सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी

Pune Tourism : सहज-सोपा ट्रेक करायचाय? पुण्यातील 'हा' किल्ला उत्तम पर्याय

SCROLL FOR NEXT