Uddhav Thackeray On Bhagva BJP Election Song Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : आदेश देणाऱ्याला जोड्यानं मारायला हवं; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा

Uddhav Thackeray On Bhagva BJP Election Song : भाजपच्या निवडणूक गीतातील 'भगवा' शब्दावर निवडणूक आयोगाने बंदी घातली असून यावर साम टीव्हीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आयोगावर जोरदार टीका केली. “आदेश देणाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Alisha Khedekar

राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. या अटीतटीच्या सामन्यात सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काही दिवसांवर निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. सगळ्याच पक्षांनी प्रचाराला जोर धरला आहे. काहींनी वचननामा प्रसिद्ध केला, काहींनी जाहिराती प्रसिद्ध केल्या, तर काहींनी निवडणूक गीतं प्रसिद्ध केल. अशातच आज भाजपच्या निवडणूक गीतातील भगवा शब्दावर निवडणूक आयोगाने बंदी घातली. यावर साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी आदेश देणाऱ्याला जोड्यानं मारायला हवं असं म्हणत, निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

निवडणूक आयोगाने भाजपच्या निवडणूक गीतातील भगवा शब्दावर बंदी घातली आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा आदेश देणाऱ्याला जोड्याने मारलं पाहिजे असे ते म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निर्णयांना चपराक देत त्यांनी म्हटलं की, माझ्या लोकसभा निवडणूक गीतामध्ये हिंदू हा तुझा धर्म हा शब्द काढायला लावला, जय भवानी जय शिवाजी हा शब्द काढायला लावला. मी काढला नाही, मी काढणारही नाही असा ठाम पवित्रा त्यांनी या वेळेस दाखवला.

पुढे ते म्हणाले निवडणूक आयोगाने त्यांच्या चौकटीत राहिला पाहिजे. जर ते भगवा शब्दाला नाकारत असतील तर मोदी आणि अमित शहा यांनी लोकसभेच्या वेळेला अयोध्येच्या नावाने जो प्रचार केला तेव्हा, त्यांना का नाही त्यांनी शिक्षा केली? असा सणसणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. शिवाय हे भलते सलते आरोप आम्ही ऐकणार नाही असं देखील ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

दादांनंतर राष्ट्रवादीची पॉवर कुणाकडे? पवार आणि राष्ट्रवादी समीकरण कायम राहणार?

SCROLL FOR NEXT