जळगाव : जळगावात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेदरम्यान पोलिसांनी सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगी नाकारली. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सुषमा अंधारे देखील सभा घेण्यावर ठाम होत्या. पोलिसांना सभा नाकारल्याने सुषमा अंधारे ऑनलाईन सभा घेतील, असं बोललं जात होतं. मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने ऑनलाईन सभाही रद्द झाली आहे. (Jalgaon News)
मुक्ताईनगरच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने अंधारेंनी ऑनलाइन सभा घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांची शुगर लेव्हल कमी झाल्याने ऑनलाईन सभा देखील रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात आज रात्री मुक्ताईनगरमध्ये शेवटची सभा होती. या सभेनंतर महाप्रबोधन यात्रेचा समारोप होणार होता. मात्र पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारल्याने सुषमा अंधारेही आक्रमक झाल्या होत्या. (Latest Marathi News)
पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्यानंतर सुषमा अंधारेंनी म्हटलं की, आम्ही जनतेच्या हिताचे जे प्रश्न विचारत आहोत, त्याची उत्तरे सरकारकडे नाहीत. मात्र माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तुम्ही किती वेळा माझा आवाज दाबाल. किती वेळा पोलीस स्टेशनला घेऊन जाणार आहात. मी प्रश्न विचारतेय पण उत्तरं देण्याऐवजी तुम्ही आवाज दाबत आहात.
गुलाबराव पाटील पालकमंत्री म्हणून सत्तेचा गैरवापर करत आहेत. एकीकडे मी शिवसेनेतील तीन महिन्याचं बाळ म्हणताय. पण याच तीन महिन्याच्या बाळाने तुमची झोप उडवली आहे. तुम्ही घाबरला आहात, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सुषमा अंधारे थांबलेल्या हॉटेलमध्ये साध्या वेशात पोलीसही उपस्थित होते. मी दहशतवादी नाही तरी माझ्या गाडीसमोर पोलिसांचा गराडा आहे. पोलिस मला जीवे मारणार नाही ना, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला होता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.