Nitesh Rane Saam TV
महाराष्ट्र

'नितेश राणेंचं एकच व्हिजन सुपारी देणं, ते टायगर नव्हे भालू'

नितेश राणेंनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी देवगडच्या भाषणात मांजरीचा का वाघाचा आवाज वाढला असं म्हणत ठाकरेंना डिवचलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनायक वंजारे -

सिंधुदुर्ग : नितेश राणेंना (Nitesh Rane) दुसऱ्यांना डिवचण्या पलीकडे दुसरं काम नाही. आदित्य ठाकरे यांच्या वर टीका करणारे नितेश राणे टायगर नसून ओरड मारणारे भालू आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयी टायगर इज बॅक असे बॅनर लावण्यापेक्षा भालू इज बॅक असे बॅनर लावले पाहिजेत अशी घणाघाती टीका शिवसेना नेते सतीश सावंत (Satish Sawant) यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

नितेश राणेंनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) देवगडच्या भाषणात मांजरीचा का वाघाचा आवाज वाढला असं म्हणत ठाकरेंना डिवचलं होतं. तसंच आदित्य ठाकरेंना आवाज वाढवायलाच पाहिजे वाढला नाही तर कसा ऐकू येणार आणि त्यांच्या आवाजामुळे तर त्यांना ओरीजनल टायगर असा उल्लेख करावा लागतो अशी टीकाही राणेंनी यावेळी केली होती आणि त्यांच्या याच टीकेला आता सेना नेते सतीश सावंतांनी उत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, नितेश राणेंना (Nitesh Rane) दुसऱ्यांना डिवचण्या पलीकडे दुसरे काम नाही. आदित्य ठाकरे यांच्या वर टीका करणारे नितेश राणे टायगर नसून ओरड मारणारे भालू आहेत. त्यामुळे त्यांच्या विषयी 'टायगर इज बॅक' असे बॅनर लावण्यापेक्षा 'भालू इज बॅक' असे बॅनर लावले पाहिजेत आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री असून ते पर्यटन दृष्ट्या हे राज्य विकसीत करण्याचे व्हिजन घेऊन काम करतायत त्याचं स्वागत कोकणातील आणि राज्यभरातील जनतेने केलं आहे. मात्र, नितेश राणेंकडे एकच व्हिजन आहे सुपारी देऊन हल्ला करण आणि दहशत माजवण या पलीकडे नितेश राणेंचं दुसर व्हिजन नाही अशी जोरदार टीका सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: 'विकासकामांचा असली पिक्चर अभी बाकी है', नितीन गडकरी

Curry leaves chutney: कढीपत्त्याची 'ही' चटणी वाढावेल जेवणाची चव

IND vs NZ 2nd Test: सँटनरची 'सुंदर' गोलंदाजी! 7 विकेट्स घेत टीम इंडियाला केलं All Out; न्यूझीलंडकडे मोठी आघाडी

Indrayani: इंदू आणि फंट्या गँगने बनवला मातीचा किल्ला, 'इंद्रायणी' मालिकेत साजरी होणार अनोखी दिवाळी

Camphor Benefits: घरात कापूर पाणी शिंपडल्याने होतात अनेक फायदे!

SCROLL FOR NEXT