Arvind Sawant Saam TV
महाराष्ट्र

गद्दारांविरोधात काम करण्यासाठी कडवट शिवसैनिक उभा आहे - अरविंद सावंत

शिवाजी पार्कमध्ये न्यायाची आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाईला सुरुवात झाली - सावंत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई: शिवसेनेच्या नेतेपदी वर्णी लागल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं त्यानंतर माध्यमांशी सवांद साधला यावेळी बोलतना त्यांनी बंडखोरांवर निशाणा साधला.

सावंत म्हणाले, 'आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेतला, आमचं पहिलं कर्तव्य ते आहे. बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) या एका दगडाला आकार आणि उकार दिला, एक शिवसैनिक आजपासून नेता हे एक फलित मला मिळालेला आहे.

आज बाळासाहेबांच्याकडे मी आशीर्वाद मागितला, माझी नेतेपदी नियुक्ती झालेली आहे कारण सध्या शिवसेना ही एका वेगळ्या परिस्थितीवर काम करत आहे. सध्या लोकशाही धोक्यात आहे आणि लोकशाहीवर हल्ले सुरू आहेत.

पाहा व्हिडीओ -

मात्र, गद्दारांविरोधात काम करण्यासाठी, जो एक कडवट शिवसैनिक आहे तो तसाच उभा आहे. शिवाजी पार्कमध्ये न्यायाची आणि मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाईला सुरुवात झाली. इथूनच जवळ असलेल्या शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनेला सुरुवात केली.

याच ठिकाणाहून हिंदुत्वाच्या रक्षणाचा अंगार पुरवला गेला, हिंदुत्वाच्या आणि सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र करण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. याच ठिकाणी काही विरोधकांनी देखील इथेच विरोध केलेला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला अर्पण केले होते. इथून पुढे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळा असा आव्हान देखील याच शिवाजी पार्कच्या मैदानातून बाळासाहेबांनी केलं होतं. मी सध्या नेता झालो आहे तरी एक शिवसैनिक म्हणूनच काम करणार आहे असं अरविंद सावंत म्हणाले.

न्यायालयामध्ये या सरकारवर सध्या टांगती तलवार आहे. त्यांनी जनतेचा विचार करण्याआधी स्वतःचा विचार करणे गरजेचे आहे अशी टीका अरविंद सावंत यांनी केली. तर गेल्या ५५ वर्षांपासून हे मैदान शिवसेना गाजवते असंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

Maharashtra Assembly Election : आष्टीत पोस्टल मतदानात दबावतंत्र; राम खाडे यांचा आरोप, निवडणूक विभागाकडे तक्रार

Disha Patani Fees: 'कंगुवा' चित्रपटासाठी दिशा पटानीने घेतले तब्बल इतके कोटी, आकडा थक्क करणारा

Karisma Kapoor: काळ्या सिक्विन साडीत करिश्मा कपूरच्या मनमोहक अदा, सौंदर्याने छेडल्या नजरा

Maharashtra News Live Updates: PM नरेंद्र मोदी यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

SCROLL FOR NEXT