chief minister Eknath Shinde Group Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde : कोकणात राजकीय भूकंप, शिवसेनेचे माजी आमदार शिंदे गटात प्रवेश करणार

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून मोठी बातमी समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्नागिरी : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातून मोठी बातमी समोर आली आहे. या मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण (Sadanand chavan) लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत. याबाबतची घोषणा चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कधीही भेटीसाठी वेळ दिला नाही, अशी नाराजी चव्हाण यांनी व्यक्त केली. (Eknath Shinde group latest news update)

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा संघाचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या भूमिकेमुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात राजकीय घमासान सुरु असताना आता चव्हाण यांनी राजकीय भूकंप केला आहे. माझा पराभव झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधीही भेटीसाठी वेळ दिला नाही.

येत्या १५ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी मी शिंदे गटात प्रवेश करणार आहे, असं चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले. चव्हाण शिंदे गटात सामील झाल्यावर शिंदे गटाला रत्नागिरी जिल्ह्यात बळकटी मिळणार आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT