Ankush Kadam Quits Swarajya Party Saam
महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंचा छत्रपती संभाजीराजेंना धक्का; नवी मुंबईतील बड्या नेत्याला फोडलं, राजकीय वर्तुळात चर्चा

Ankush Kadam Quits Swarajya Party: नवी मुंबईतील राजकीय घडामोडींमध्ये शिंदे गटाची ताकद वाढलीय. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश कदम शिवसेना शिंदे गटात दाखल.

Bhagyashree Kamble

  • नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग.

  • महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला धक्का.

  • एकनाथ शिंदे गटात बड्या नेत्याची एन्ट्री.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. कुठे फोडाफोडीचं राजकारण तर, कुठे स्वखुशीनं नेते मंडळी पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. अशातच नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांना धक्का दिलाय. महत्वाच्या नेत्यानं शिंदे गटाची साथ दिली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची नवी मुंबईत ताकद वाढली आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी शिवसेना शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये अंकुश कदम यांचा पक्षप्रवेश केला जाणार आहे.

अंकुश कदम यांच्यासह अनेक समर्थक पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. अंकुश कदम हे नवी मुंबईत मराठा चेहरा म्हणून ओळखले जायचे. मात्र, त्यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. कदम यांनी मराठा स्वराज्य पक्षाला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे छत्रपती संभाजीराजे यांना मोठा धक्का बसला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंकुश कदम यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या हालचालींमुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ही काय स्टंटबाजी वाटते का?' कारवरील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके संतापले; मनोज जरांगेंना सुनावलं

Maharashtra Live News Update: शेतकऱ्याने घेतले तहसील कार्यालयातच विष; प्रकृती गंभीर

कर्माधिकारी शनिदेव चाल बदलणार, ३ राशींचे आयुष्य बदलणार, पाहा काय होणार फायदा

Kajol Slapped Actor: एक दोन नाही तब्बल १० वेळा काजोलने 'या' अभिनेत्याच्या मारलं कानाखाली; या कारणामुळे संतापली अभिनेत्री

पार्कमध्ये काँग्रेस नेत्याची हत्या; बॅटनं मारलं अन् गोळ्या झाडल्या, CCTVतून मारेकऱ्याची ओळख पटली

SCROLL FOR NEXT