Eknath Shinde Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde Speech : 'याच मैदानावर फुसका आपटी बार येऊन गेला', मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर शाब्दिक 'गोळीबार'

Political News : आदळआपटाला, टोमण्यांना मी उत्तर देणार नाही, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

साम टिव्ही ब्युरो

Ratnagiri News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडमधील गोळीबार मैदानातील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही गर्दीशी तुलना करायला आलेलो नाही. आम्हाला कुणालाही उत्तर देण्याची गरज नाही. याच मैदानात फुसका आपटी बार येऊन गेला.

त्यांच्याकडे खोके, गद्दार एवढेच शब्द आहेत. आदळआपटाला, टोमण्यांना मी उत्तर देणार नाही. त्यांचे असले सर्कशीचे शो राज्यभर होणार आहेत, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लागवला. (Political News)

सत्तेसाठी ज्यांनी हिंदु्व सोडलं, मला त्यांच्याबद्दल सांगण्याची गरज नाही. आपलाच पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला, तो आम्ही सोडवला. युतीत आम्ही लढलो. मात्र मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी बेईमनी केली. तो डाग आम्ही पुसण्याचं काम केलं. म्हणूनच निवडणूक आयगाने आपल्याला तो धनुष्यबाण दिला. बाळासाहेब ठाकरेंचा आशिर्वादही आपल्यासोबत आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

गद्दारी आम्ही नाही केली, गद्दारी २०१९ साली झाली. उद्धव ठाकरेंनी तर बाळासाहेबांच्या विचारांना चुकीचं ठरवलं. बाळासाहेब तुमचे वडील होते पण ते आमचे दैवत आहेत. बाळासाहेबांचे तुम्ही संपत्तीचे वारसदार आहात. आम्ही विचारांचे वारसदार आहेत. भारताचे तुकडे तुकडे करायला निघालेल्या गँगसोबत तुम्ही आहात? असा सवालही एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.

कोकणी माणसांनी बाळासाहेबांवर खूप प्रेम केलं. बाळासाहेबांच्या जसा हा कोकणी माणूस पाठीशी होता, तसाच आजही शिवसेनेच्या, बाळासाहेबांच्या विचाराच्या पाठीशी आहे. कोकणचा माणूस हा शब्दाला जागणारा आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात तापमानाचा पारा 6.2°c वर

फॉर्म १३ ची गरज नाही, नोकरी बदलताच ५ दिवसांत पीएफ ट्रान्सफर

Mumbai: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; सोशल मीडियावर पोस्ट करत केला 'जय महाराष्ट्र'

Konkan Travel : 'गणपतीपुळे'जवळ वसलाय भव्य किल्ला, ऐतिहासिक वैभव पाहून डोळे दिपतील

Nilesh Sable-Bhau Kadam : निलेश साबळे-भाऊ कदम पुन्हा एकत्र? 'त्या' VIDEOनं चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT