kirit somaiya vehicles canvoy 
महाराष्ट्र

भाजप नेत्याच्या ताफ्यावर शिवसैनिकांची दगडफेक; वाहनांवर शाईफेक

गजानन भोयर

वाशिम : भाजप नेते किरीट सोमय्या kirit somaiya यांच्या ताफ्यातील वाहनांवर शिवसैनिकांनी shivsainik आज (शुक्रवार) दगडफेक व शाई फेक केल्याची घटना घडली आहे. पाेलिसांनी संबंधित शिवसैनिकांना घटनास्थळावरुन हुसकावून लावले.

शिवसेना खासदार भावना गवळी bhavan gawali यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर शंभर कोटींच्या घोटाळ्याचे आरोप साेमय्या यांनी केले आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी आज वाशिमचा दाैरा आखला आहे.

भाजप नेते सोमय्या यांनी येथे येण्यापुर्वी अकाेल्यात चार महान शिवसैनिकांचे घाेटाळे उघडकीस आणणार असल्याचा दावा पत्रकारांशी संवाद साधताना केला हाेता. त्यामध्ये त्यांनी खासदार भावना गवळी यांचा नामाेउल्लेख केला हाेता.

दरम्यान खासदार गवळी यांच्या संस्थेच्या कारखान्याची पाहणी करण्याकरिता साेमय्या आले हाेते. त्यावेळी खासदार भावना गवळी यांच्या समर्थकांनी साेमय्यांच्या वाहनाच्या ताफ्यास काळे झेंडे दाखवित त्यांचा निषेध नाेंदविला.

त्याचवेळेस त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर दगडफेक झाली kirit somaiya vehicles canvoy . काही शाई देखील वाहनांवर फेकली. या प्रकारमुळे पाेलिसांनी शिवसैनिकांवर लाठी हल्ला केला. दरम्यान साेमय्या हे त्या ठिकाणी न थांबता पुढे निघून गेले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT