chandrahar patil saam tv
महाराष्ट्र

Chandrahar Patil: शिवराजने खरं तर पंचांना गोळ्या घालायला पाहिजेत; महाराष्ट्र केसरी वादावर चंद्रहार पाटलांची संतप्त प्रतिक्रिया

Chandrahar Patil On Shivraj Rakshe: डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार यांनी शिवराज राक्षेच्या वादावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Ankush Dhavre

कुस्तीक्षेत्रात मानाची समजली जाणारी ६७ वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्यानगरमध्ये पार पडली. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील कुस्तीपटू पृथ्वीराज मोहोळ मानाची गदा पटकावण्याच्या मानकरी ठरला. दरम्यान या सामन्यापूर्वी झालेल्या सेमीफायनलच्या सामन्यात पृ्थ्वीराज मोहोळचा सामना डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेसोबत झाला.

या सामन्यादरम्यान महाराष्ट्र केसरीला गोंधळाचे गालबोट लागले. पंचांनी दिलेल्या निर्णयावरुन शिवराज राक्षे संतापला. त्यानंतर शिवराजने पंचांची कॉलर ओढली आणि त्यांना लाथही मारली. दरम्यान आता या वादावर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रहार पाटील ?

शिवराज राक्षेने पंचांना लाथ घातलेल्या प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया देताना चंद्रहार पाटील म्हणाले, ' खरं तर काल जो प्रकार घडला तो चुकीचा होता. पण मी चुकीचा इतकाच म्हणेल की, पंचांना शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली. शिवराजवर जो अन्याय झालाय, त्या पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे. असं माझं स्पष्ट मत असल्याचं चंद्रहार पाटील यांनी सांगितलं.

यापूर्वी २००९ मध्येही चंद्रहार पाटील यांच्यासोबतही असाच काहीसा प्रकार घडला होता. याबाबत बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले की,'जो अन्याय शिवराजसोबत झालाय तोच अन्याय २००९ मध्ये माझ्यासोबतही झाला होता.

शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता. मीही तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होतो. मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि ६ मिनिटांची कुस्ती दीड तास सुरु ठेवल्यामुळे मी जो अन्याय सहन केला होता, तोच अन्याय आज शिवराजला सहन करावा लागत आहे. कुस्ती झालीये की नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे. या प्रकरणात शिवराजची कुठलीही चूक नाही. असं चंद्रहार पाटील यांनी म्हटलंय.

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, गादी विभागातील सेमीफायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे हे दोघे आमनेसामने आले होते. या सामन्याला सुरुवात होताच १ मिनिटाच्या आत पंचांनी कुस्ती झाल्याचा निर्णय दिला. मात्र शिवराजच्या मते त्याची पाठ खाली टेकली नव्हती. त्याने रिप्लेची मागणी केली होती. मात्र रिप्ले न मिळाल्याने त्याने संतापात पंचांची कॉलर ओढली आणि लाथही मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

बीड पुन्हा चर्चेत; पोलीस कर्मचारी २००० लाच घेताना ACBला सापडला

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

SCROLL FOR NEXT