Shivneri Fort: Saam Tv
महाराष्ट्र

Shivneri Fort: शिवनेरी किल्ल्यावर मधमाश्यांचा हल्ला, ५० दुर्गप्रेमी जखमी; नेमकं घडलं काय?

Bee Attack Injures 50 Tourists: शिवनेरी किल्ल्यावर मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये ५० शिवप्रेमी जखमी झालेत. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमी शिवप्रेमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Priya More

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर मधमाश्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. मधमाश्यांच्या हल्ल्यामध्ये ४० ते ५० जण जखमी झालेत. अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्यामध्ये शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी आणि स्वच्छता मोहिमेसाठी आलेल्या दुर्गप्रेमींवर मधमाश्यांनी हल्ला केला. मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्यामुळे किल्ल्यावर एकच गोंधळ उडाला. सर्वांची पळापळ झाली. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, किल्ले शिवनेरीवर आग्या मोहळ उठल्यामुळे किल्ल्यावर आलेल्या शिवप्रेमींची एकच धावपळ उडाली. शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवी मंदिर परिसरात आज सकाळी ही घटना घडली. शिवाई मंदिराजवळ उभ्या असलेल्या शिवप्रेमींवर मशमाश्यांनी हल्ला केला. आग्या मोहळ उठल्याचे कळताच किल्ल्यावर आलेले काही शिवप्रेमी आडोश्याला लपले तर काही दगडामागे तर काही झाडामागे लपले.

शिवनेरी किल्ल्यावर सकाळी ११ वाजता खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत गडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार होती. त्याआधीच शिवाई देवी मंदिर परिसरात मधमाश्यांनी अचानक शिवप्रेमींवर हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये ४० ते ५० जण जखमी झाले असून जखमींवर जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यावेळी खासदार निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन शिव भक्तांच्या प्रकृतीची विचारपुस केलीय मात्र शिवनेरी गडावर मदमाश्या आक्रमक असल्याने मोठा धोका असल्याने वनविभागाकडून सतर्क रहाण्याच्या सुचना देण्यात आल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणीत शक्तीपीठ महामार्गावरून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा

Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर सलग ३ वर्ष बलात्कार

Sharara Designs: लग्न किंवा पार्टीसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी आणि सुंदर शरारा डिझाईन्स, तुम्ही दिसाल सगळ्यात फॅशनेबल

२८ वर्षांच्या तरुणीचं ६० वर्षीय मॅनेजरशी सूत जुळलं; दोघांनी पळून जाऊन लग्न केलं, फोटो व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ

Crime News: हळदीच्या दिवशी विपरित घडलं; दोन वधू बहिणींचा संशयास्पद मृत्यू; तांत्रिक कनेक्शनमुळे परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT