satara, shivendraraje bhosale, udayanraje bhosale, Pratapgad, Satara, Shivpratap Din saam tv
महाराष्ट्र

Shivendraraje Bhosale : छत्रपतींच्या घराण्याचा वारसा सांगता ना ? असं का म्हणाले शिवेंद्रराजे उदयनराजेंना

शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी आज साता-यात पत्रकारांशी संवाद साधला.

ओंकार कदम

Shivendraraje Bhosale : प्रतापगडावरील शिवप्रताप दिन साेहळ्याचे उदयनराजेंना निमंत्रण दिलं गेले नाही असे उदयनराजेंनी (udayanraje bhosale) बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले हाेते. त्याबाबत आज माध्यम प्रतिनिधींनी आमदार शिवेंद्रराजे भाेसले यांचे लक्ष वेधले असता त्यांना मला जिल्हाधिकारी कार्यालयातून निमंत्रण आलं होतं. परंतु आपण ज्या घराण्यात जन्मलो आहे त्या घरातील कार्यक्रमाला जायला निमंत्रण कशाला लागते. प्रतापगडावरील देवस्थान जर आपल्या मालकीची असेल तर मुख्यमंत्र्यांच्या फोनची वाट बघायची गरज काय अशी खोचक टीका आमदार शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजेंवर (udayanraje bhosale) केली.

दरम्यान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी समान नागरी कायद्याबाबत देखील त्यांचे मत व्यक्त केले. ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांनी देशाचे हित समोर ठेवून अनेक निर्णय घेतले यामध्ये कश्मीर मधील 370 कलम, अनेक वर्षाची ही मागणी होती. समान नागरी कायदा हा राज्याच्या हिताचा निर्णय असेल असं मला सुद्धा वाटतंय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे.

मंगल प्रभात लोकांच्या वक्तव्यावरून आमदार शिवेंद्रराजे भाेसले म्हणाले मी स्वतः त्या कार्यक्रमाला होतो. त्यांनी जे विधान केलंय ते कोणाशी तुलना करून केलेलं नाही. आता अलीकडच्या काळात कुठलेही वक्तव्य केले की भावना भडकण्याचा प्रयत्न होतोय पण काल त्यांच्या विधानातून असं काही दिसून येत नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : "तुम्हाला घरपोच दारू मिळेल" होम डिलिव्हरीचे आमिष दाखवून ग्राहकांना लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: BMC ची वनक्षेत्र आणि संरक्षित झोपडपट्टी परिसरात टॉवर उभारण्यास परवानगी

EPFO Alert : नोकरदारांनो लक्ष द्या! ऑक्टोबरचा PF जमा करण्याची शेवटची तारीख ठरली! लगेच जाणून घ्या

Pen Fort : इतिहासप्रेमी अन् ट्रेकर्ससाठी पर्वणी! पेणजवळील 'या' ५ किल्ल्यांची सफर तुम्हाला नक्की आवडेल

Protein Supplements: प्रोटीन सप्लीमेंटमुळे कोलेस्ट्रॉल वाढतंय? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या व्यक्तींना असतो धोका

SCROLL FOR NEXT