Satara News: अखेर शिवसेनेने (उद्धव ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बदलला; शेखर गोरेंवर सातारा जिल्ह्याची जवाबदारी

बऱ्याच वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्यावर जवाबदारी होती.
Satara news
Satara newsSaam Tv
Published On

Satara News: शिवसेनेत मुख्यमंत्री एकमनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनंतर खासदारांनाही शिवसेनेत गळती लागली. अजुन देखील शिवसेनेतील अनेक नेते बाळासाहेबांची शिवसेनामध्ये जाताना दिसतात. अशात जिल्हा पातळीवरही याचे परिणाम दिसत आहेत. त्यामुळे साताऱ्यात (Satara) जिल्हा संपर्क प्रमुख या पदावर दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली आहे.

बऱ्याच वर्षांपासून सातारा जिल्ह्यातील शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून प्रा.नितीन बानगुडे पाटील यांच्यावर जवाबदारी होती.परंतु या काळात पक्षाची म्हणावी तशी घोड दौड होऊ शकली नाही.उलट पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे जिल्ह्यातील अनेक पदाधिाऱ्यांनी पक्षाला राम राम ठोकला.या नंतर अनेकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला.हे जिल्ह्यातील नुकसान थांबवण्यासाठी अखेर आता पक्षाने जिल्हा संपर्क प्रमुख पदी जिल्ह्यातील युवकांचे मोठे संघटन असणारे माण खटाव तालुक्यातील शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांची निवड केली आहे.तर नितीन बानुगडे पाटील यांना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून जवाबदारी दिली आहे.

Satara news
Satara News : उदयनराजेंना सल्ला द्यायला ते साताऱ्यात असतात कधी? पेपरबाजी करायची अन् गायब व्हायचं; शिवेंद्रराजेंची जोरदार टोलेबाजी

शेखर गोरे हे उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात तर त्यांच्याकडे युवकांचे मोठे संघटन आहे.जिल्ह्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती,ग्रामपंचायत यांच्यावर सुद्धा मोठी पकड आहे.मध्यंतरी झालेल्या जिल्हा मध्वर्ती बँकेच्या निवडणुकीवेळी निर्णायक विजय (Victory) मिळवत जिल्ह्यातील राजकीय वजन दाखवून दिले होते.जिल्ह्यातील शिवसेना वाढवण्यासाठी आता खुद्द उद्धव ठाकरेंनीच शेखर गोरे यांची निवड केल्याचे बोलले जात आहे. ही निवड करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात तसेच भाजप, राष्ट्रवादी चे मोठ्या प्रमाणात असलेल्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी केली आहे.आता शेखर गोरे ही जवाबदारी कशा प्रकारे घेणार या कडे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com