सातारा (satara news) : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (dcc bank) अध्यक्षपदी (कै.) लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांची निवड झाली आहे आहे. दरम्यान उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांना संधी मिळाली आहे. देसाई हे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचे समर्थक मानले जातात. जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदी पुन्हा वर्णी लागावी यासाठी विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली हाेती. परंतु पवार यांनी नितीन पाटील यांना बॅंकेच्या अध्यक्षपदी संधी दिली आहे. satara district cooperative bank election 2021 chairman nitin patil
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज (साेमवार) अर्ज भरले जाणार आहेत. त्या अनुषंगाने बॅंकेत विद्यमान संचालक मंडळ उपस्थित राहिले आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भाेसले, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, बॅंकेचे विद्यमान अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भाेसले आदींचा समावेश आहे.
दरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन संचालक मंडळात आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांना मानणारा एक गटाने पुन्हा शिवेंद्रसिंहराजेंनाच बॅंकेचे अध्यक्ष करा असा आग्रह धरला हाेता. तर दूसरीकडे गतवर्षी संधीपासून दूरावलेल्या (कै.) लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घालावी अशी मागणी राष्ट्रवादीतून झाली हाेती. सहकारातील निवडणुका या पक्षीय पातळीवर नसून स्थानिक पातळीवर लढल्या जातात असं नुकतेच स्पष्ट करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा DCC त शिवेंद्रसिंहराजेंना अध्यक्षपदाची संधी देणार की गतवेळी थाेड धीर धरा म्हटलेल्या नितीन पाटलांना याकडे जिल्हावासियांची लक्ष लागून राहिलेले हाेते. अखेर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नितीन पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ घातली आहे.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.