udayanraje bhosale and shivendraraje bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara: छत्रपतींच्या विचारावरुन साता-याच्या दाेन्ही राजेंत पेटलं शाब्दिक युद्ध

साता-यातील दाेन राजे सध्या एकमेकांवर टीका करु लागले आहेत.

ओंकार कदम

सातारा : उदयनराजेंनी (udayanraje bhosale) माझ्याबद्दल मी छत्रपतींचा (chhatrapati shivaji maharaj) विचाराचा आहे का हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला आहे. उदयनराजे थोर विचारवंत आहेत काय? इतिहासकार आहेत का? उदयनराजे जर छत्रपतींच्या विचाराने चालणारे आहेत तर लोकसभेला (loksabha election) तुमचा पराभव का झाला आणि त्याच विधानसभेच्या निवडणुकीत मी निवडून का आलो याचे उत्तर उदयनराजेंनी द्यावे असे आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी (satara) राजेंना दिले आहे. (udayanraje bhosale latest marathi news)

खासदार उदयनराजे यांनी जावळी तालुक्यातील एका कार्यक्रमात आमदार शिवेंद्रराजे यांचे नाव न घेता त्यांच्यावर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या बाबत गंभीर आरोप करताना छत्रपती घराण्याचा वारसा सांगताना शिवाजी महाराजांचे आचार-विचार आचरणात आणून जोपासले पाहिजेत अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली हाेती.

त्यास आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले रात्रीचं उशिरा गाड्या फिरवायचा आणि त्यामध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून गावातून फिरायचं हे उदयनराजे यांच्या दृष्टीने छत्रपतींचे विचार आहेत का?

आपण जसे यात्रेमध्ये डोंबाऱ्याचा खेळ बघतो तसा उदयनराजे यांच्या वाढदिवसाला देखील एक डोंबाऱ्याचा खेळ आपण बघितला असेही शिवेंद्रराजेंनी नमूद केले. ते म्हणाले आपण कोण आहोत, आपण राज्यसभेचे खासदार आहोत, आपण काय करतो याचा कुठेतरी आपण भान ठेवले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT