shivendraraje bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara Politics: त्यांना हद्दपार करण्याची हीच ती वेळ : शिवेंद्रसिंहराजे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारकरांना भरभरून दिले आहे. कास धरण उंची वाढ, हद्दवाढ, मेडिकल कॉलेज हे जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा केल्याने मंत्री पवार यांनी हे प्रश्न मार्गी लावले. पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी मंत्री पवार आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० कोटी निधी दिला आहे असेही आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी नमूद केले.

ओंकार कदम

सातारा : सातारा नगरपालिकेत (satara muncipal council) चांगले प्रशासन आणण्यासाठी सातारकरांनी भ्रष्ट 'कचरा' बाहेर टाकण्याची वेळ आल्याचे सांगत आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी सत्ताधाऱ्यांना (udayanraje bhosale) आगामी निवडणुकीत घरचा रस्ता दाखवावा असे आवाहन सातारकरांना (satara) केले आहे. (udayanraje bhosale latest marathi news)

आगामी काळात सातारा पालिकेच्या हाेऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने साता-यातील दाेन्ही राजेंमध्ये सध्या शीत युद्ध सुरु झालेले आहे. तालुक्यातील काेणत्याही कार्यक्रमांना गेलं की दाेन्ही नेते एकमेकांच्या वक्तव्याचा समाचार घेतात. त्यातून राजकीय आराेप प्रत्याराेप सुरु हाेतात असं चित्र सध्या येथे सुरु आहे. काही दिवसांपुर्वी खासदार उदयनराजे भाेसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचे नाव न घेता त्यांच्यावर भ्रष्टाचाराची टीका केली. त्यास शिवेंद्रसिंहराजेंनी देखील प्रत्युत्तर दिलं.

आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी खासदार उदयनराजे भाेसले यांच्या ताब्यात असलेल्या सातारा पालिकेचा कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण करीत गत ५ वर्षात सातारा पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण बनवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी सातारकरांच्या पैशांची अक्षरशः लूट केल्याचा आराेप केला आहे. ठेकेदारी, टक्केवारीसाठी साविआच्या नगरसेवकांमध्ये झालेल्या प्रकार उघड्या डोळ्याने पाहण्याची दुर्दैवी वेळ नागरिकांवर आल्याचे म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बजरंगाची कमाल...अन् जेवणाच्या पंगतीत वानर सेनेची धम्माल

Maharashtra Live News Update : महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट, बळीराजा संकटात

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT