shivendraraje bhosale, udayanraje bhosale, satara saam tv
महाराष्ट्र

Udayanraje Bhosale Birthday : उदयनराजेंना वाढदिनी शिवेंद्रसिंहराजेंच्या शुभेच्छा; मनाेमलिनावर म्हणाले...

उदयनराजेंचा शुक्रवारी वाढदिवस हाेता. देश-परदेशातील मान्यवरांसह जनतेने त्यांना शुभेच्छा दिल्या.

ओंकार कदम

Satara Political News : साताऱ्यात नगरपालिकेवरून (satara muncipal council) दोन्ही राजेंची शाब्दिक चकमक पुन्हा एकदा उडाल्याची पाहयाला मिळत आहे. उदयनराजेंच्या (udayanraje bhosale latest news) आघाडीने नगरपालिका लुटून खाल्ल्याचा आराेप आमदार शिवेंद्रराजे भाेसले (shivendraraje bhosale latest news) यांनी साविआवर केला. आमच्या आघाडीने पैसे खाल्ले असते तर कामे झाली असती का असा सवाल खासदार उदयनराजे भाेसले यांनी शिवेंद्रराजेंच्या आराेपाला उत्तर देताना माध्यमांशी बाेलताना केला. (Breaking Marathi News)

साताऱ्यात नगरपालिकेच्या मुद्द्यावर आता दोन्ही राजे हे पुन्हा एकदा एकमेकांवर बरसले आहेत. आज साताऱ्यात पार्किंग च्या समस्येसाठी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी साताऱ्यातील व्यापारी नागरिक आणि नगरपालिकेचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. या बैठकीत साताऱ्यातील नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना समस्यांचा पाढा वाचून दाखवला.

ही बैठक संपल्यानंतर आमदार शिवेंद्रराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना त्यांनी उदयनराजे अध्यक्ष असलेल्या सातारा विकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले येणारी नगरपालिका आम्ही भाजप आणि आम्ही एकत्र लढवू.

उदयनराजेंशी तडजाेड शक्य नाही : शिवेंद्रराजे

उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडी बरोबर आमची तडजोड होणे शक्य नाही. गेली पाच वर्ष सातारकरांना गोड स्वप्न खासदार उदयनराजेंनी दाखवल होते पण सर्वांचा स्वप्न भंग झाला आहे. गेल्या पाच वर्षात सातारा विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी साताराची नगरपालिका हे लुटून खाल्ली आहे. उलट त्यांची शर्यत लागली होती की तुला जास्त मिळतं की मला जास्त मिळतं कुठलाही मोठा प्रकल्प या पाच वर्षात करता आलेला नाही.

...खुशाला बाेला

शिवेंद्रराजेंच्या आरोपांना उत्तर देताना खासदार उदयनराजे यांनी हे सर्व आरोप फेटाळत आघाडीने पैसे खाल्ले असते तर कामे झाली असती का असा सवाल उपस्थित केला आहे. बोलताना विचार करून बोलावं, देवानं तोंड दिलं आहे आणि जीभ दिली आहे म्हणून खुशाल बोला असा टोला उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना लगावला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT