Shivrajyabhishek Sohala Raigad SaamTv
महाराष्ट्र

Shivrajyabhishek Sohala Raigad: शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू; हजारो शिवभक्त रायगडावर दाखल

Shivrajyabhishek Sohala Raigad: छत्रपती शिवाजी महाराजांच्या 353 व्या तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर हजारो शिवभक्त दाखल झाले आहेत. छत्रपती संभाजी राजेंनी स्वच्छता आणि शिस्त पाळण्याचे आवाहन केले.

Shruti Vilas Kadam

Shivrajyabhishek Sohala Raigad: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353 व्या तारखेनुसार राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर शिवभक्तांचा महासागर उसळला आहे. 6 जून रोजी होणाऱ्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून लाखो शिवभक्त किल्ले रायगडाच्या पायथ्याशी दाखल झाले असून संपूर्ण परिसर महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला आहे आहे.

यावेळी छत्रपती संभाजी राजे स्वतः पायी मार्गाने किल्ले रायगडाकडे रवाना झाले आहेत. नाणे दरवाजा मार्गावर शिवभक्तांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. हजारो शिवभक्तही त्यांच्या सोबत पायी गडाकडे निघाले. यावेळी संभाजी राजेंनी उपस्थित शिवभक्तांशी संवाद साधत महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

'मला अतिशय आनंद होत आहे की हा राज्याभिषेक सोहळा आता लोकसोहळा होत आहे.म्हणून तिथे येणारा सर्व शिवभक्तांना मी सांगू इच्छितो आपण रायगडावर केवळ पर्यटनासाठी आलेलो नाही, तर शिवराज्याभिषेकासारख्या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे गडावर कुठेही कचरा करू नका, स्वच्छता राखा आणि शिवरायांच्या स्मृतींना साजेसे वर्तन करा.' असे आवाहन त्यांनी केले. तसेच, 'मी जसा या सोहळ्याचा आनंद घेत आहे, तसाच आनंद तुम्हीही घ्या. जल्लोष करा, पण शिस्त आणि जबाबदारी विसरू नका.' असेही ते म्हणाले.

दरम्यान, शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी 1,198 पोलीस कर्मचारी, 150 पोलीस अधिकारी, तीन आरसीपी पथके, एक एसआरपीएफ कंपनी, तीन बीडीडीएस (बॉम्ब शोधक व नाशक पथके) तसेच ड्रोनद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. रायगडावरील राजमहल, सदर, होडीमार्ग आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणीही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 50 हजारांहून अधिक शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत. उद्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड परिसरात उत्साहाचे वातावरण असून शिवभक्तांमध्ये मोठा जल्लोष आणि भक्तिभाव पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता उद्या होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT