ZERO EMISSION BUS Saam tv
महाराष्ट्र

MSRTC's 1st Electric Bus SHIVAI: खुशखबर! छत्रपती संभाजीनगरातून साडेचार तासांत पुणे गाठा, 'या' बसमुळे प्रवास सुकर होणार

Chhatrapati Sambhaji Nagar to Pune eBus: उद्यापासून छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर ही शिवाई नावाची ई-बस धावणार आहे.

Vishal Gangurde

नवनीत तापडिया

Chhatrapati SambhajiNagar News: शहराच्या मध्यवर्ती आगारात पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. उद्यापासून छत्रपती संभाजीनगर ते पुणे मार्गावर ही शिवाई नावाची ई-बस धावणार आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगरातून पुण्यात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. (Latest Marathi News)

छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती आगारात शिवाईच्या आणखी चार बस दाखल होणार आहे. त्यातील ३ बस दाखल झाल्या आहेत. म्हणजेच पहिल्या टप्प्यात एकूण पाच ई-बस मिळणार आहेत. या बसने प्रवाशांना अवघ्या साडेचार तासांत पुणे गाठता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाला एकूण 200 बस मिळणार आहेत.

राज्यात 1 जून 2022 रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर पहिली इलेक्ट्रिक बस सुरू झाली. टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर एसटी विभागाला पहिल्या टप्प्यात पाच बस मिळणार आहेत. या बसमध्ये महिला प्रवाशांना तिकीटात 50 टक्के सवलत, ज्येष्ठांना मोफत प्रवास असेल.

या बससाठी विभागीय कार्यशाळेशेजारी इलेक्ट्रिक बसेस चार्जिंग सेंटर तयार करण्यात आले आहे. ही बस दीड तासात चार्ज होते. एकदा चार्ज केल्यानंतर 350 किमी धावेल. पुण्याचे अंतर 250 किमीपेक्षा कमी आहे. पुण्याला गेल्यावर पुन्हा बस चार्ज करून छत्रपती संभाजीनगरला येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड शहरात ठाकरे सैनिकांनी एकत्र साजरा केला जल्लोष

Thane Traffic Alert : ठाणे - घोडबंदर मार्ग पुढील पाच दिवस वाहतुकीसाठी बंद; पर्यायी मार्ग कोणता?

Pune: 'मला पप्पी दे, माझ्याकडे पैसे आहेत'; ७३ वर्षीय वृद्धाकडून २७ वर्षीय तरूणीचा विनयभंग, पुण्यात खळबळ

Coffee while fasting: कॉफी प्यायल्याने उपवास मोडला जातो का?

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

SCROLL FOR NEXT