Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal Corporation Saam Tv
महाराष्ट्र

भाजपच्या गडात शिवसेनेचे 'मिशन महापौर'

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर - भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या नागपुरात शिवसेनेनं 'मिशन महापौर' सुरू केलं आहे. आगामी नागपूर (Nagpur) महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं (Shivsena) जय्यत तयारी सुरू केली आहे. यासाठी विशेष रणनीती आखली जात आहे. सध्या भाजप आणि सेनेत विस्तव ही जात नाही इतके संबंध ताणले गेले आहे. त्यामुळं भाजपला मात देण्यासाठी सेना कामाला लागली आहे. नागपूर महापालिकेत गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची (BJP) सत्ता आहे.

हे देखील पाहा-

ही सत्ता काबीज करण्यासाठी सेनेनं रणनीती आखली आहे. प्रत्येक वॉर्ड मध्ये शाखा सुरू केली असून कार्यकर्ते जोडण्याचं काम सुरू आहे. लोकांचं काम करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. विशेषतः सामाजिक विषय हाताळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आघाडी झाली तर ठीक नाहीतर सर्व जागांवर लढण्याची तयारी सेनेनं केल्याचं सेनेचे प्रदेश प्रवक्ते किशोर कन्हेरे सांगितलं आहे.

सेनेनं नागपुरात मिशन महापौर सुरू केलं असलं तरी हे इतकं सहज नाही. नागपुरात भाजपचं मोठं नेटवर्क आहे. त्या तुलनेत शिवसेना कुठेही नाही. त्यामुळं सेनेच्या या मिशन महापौरला किती यश मिळते हे पाहणं महत्वाचे ठरेल.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

Breaking News: अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

Crime News: पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारी.. प्रियकराच्या मदतीने काढला काटा; ४ जण अटकेत

Buldhana Accident : ट्रक- डंपरची धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोन गंभीर जखमी

Pune Bus Fire: पिरंगुट घाटात भीषण अग्नितांडव! धावती बस पेटली, जळून झाला कोळसा

SCROLL FOR NEXT