Narayan Rane vs Uddhav Thackeray Maharashtra Political News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे १० आमदार फुटणार; नारायण राणेंचा मोठा दावा

Narayan Rane News: लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १० आमदार शिंदे गटात प्रवेश करणार, असा मोठा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.

Satish Daud

Naraan Rane vs Uddhav Thackeray

लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे १० आमदार शिंदे गटात प्रवेश करणार, असा मोठा दावा भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. पुढच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना कायमचीच सुट्टी देण्यात येईल, असा टोलाही राणे यांनी लगावला आहे. ते रत्नागिरी येथे माध्यमांसोबत बोलत होते.

नारायण राणेंच्या (Narayan Rane) या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून उलट सूलट चर्चांना उधाण आलं आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून राजकीय नेत्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

नारायण राणे यांना भाजपने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर होताच नारायण राणे यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. नारायण राणे यांचा सामना शिवसेना ठाकरे गटाचे (Uddhav Thackeray) उमेदवार विनायक राऊत यांच्यासोबत होणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत माझा अडीज ते तीन लाख मताधिक्याने विजय होणार, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला आहे. मी परत निवडून आल्यावर मला कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, विनायक राऊत यांना काय मिळणार असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावला आहे.

"ठाकरे गटाचे १० आमदार फुटणार"

लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे १० आमदार शिंदे गटात जातील, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. उर्वरित ६ आमदारांपैकी किती आमदार ठाकरे गटात राहतील हे सांगता येत नाही. पुढच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना कायमचीच सुट्टी मिळेल, असं देखील नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मनमाड नगरपरिषदेची उद्या पोटनिवडणूक

Cable Stayed Bridge : खुशखबर! ठाणे-नवी मुंबई प्रवास अवघ्या काही मिनिटांत होणार; कोपरी ते पटनीदरम्यान पूल उभारला जाणार, कसा असेल मार्ग?

'पाणी द्या, अन्यथा...'; डोंबिवलीकरांचा पाणीटंचाईवरून संताप, महिलांचा पालिकेवर हंडा-कळशी मोर्चा

High blood pressure: सकाळी तुमच्या या ३ सवयींमुळे वाढतोय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल

Times Square Firing: भर दिवसा गोळीबाराचा थरार; मोठ्या आवाजाने रस्त्यावर नागरिकांची धावाधाव, अमेरिका हादरली

SCROLL FOR NEXT