UBT Leader Santosh Sawant Saam Tv News
महाराष्ट्र

ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याचा मृत्यू; रिक्षा चालवताना घडला भीषण अपघात, २ प्रवाशांचेही निधन

UBT Leader Santosh Sawant: रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू. मृतांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख संतोष सावंत यांचा समावेश.

Bhagyashree Kamble

  • रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू.

  • मृतांमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखाप्रमुख संतोष सावंत यांचा समावेश.

  • चौघेजण जखमी; त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू.

  • सावंत यांच्या निधनामुळे कणघर परिसरात शोककळा.

रायगडमधील म्हसळा तालुक्यातील गोरेगाव - म्हसळा रोडवर रिक्षाचा भीषण अपघात घडला. या भयंकर अपघातात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुख संतोष सावंत यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला. तर, चौघेजण जखमी झाले असल्याची माहिती आहे. सावंत यांच्या अपघाती निधनामुळे कणघरवर शोककळा पसरली आहे.

शिवसेना पक्षाचे शाखाप्रमुख संतोष सावंत यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताची घटना खामगाव परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. संतोष सावंत हे कणघरचे शाखाप्रमुख होते. त्यांची निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख होती. त्यांच्याकडे पक्षाचे शाखाप्रमुख हे पद होतं.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी ते रिक्षाही चालवत होते. रविवारीही त्यांनी भाडे घेतले होते. दुपारी म्हसळा गोरेगावचे भाडे घेतले असल्याची माहिती आहे. गोरेगावकडे जातना ताम्हणे शिर्के ते कासार मलाई या वाटेवर त्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात घडला. रिक्षा अनियंत्रित होऊन थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली.

रिक्षा जोरात आदळल्यामुळे सावंत गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, रिक्षामध्ये सहा प्रवासी होते. सहा प्रवासी गंभीर जखमी होते. स्थानिकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान, २ प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण तिघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून, सावंत यांच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Genelia Deshmukh Married Age: 'तुझे मेरी कसम' चित्रपटात भेट, ८ वर्षांनी केलं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाशी लग्न, कोण आहे ही अभिनेत्री

Maharashtra State Cooperative Bank : यंदाची दिवाळी होणार गोड, राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना 14 टक्के बोनस जाहीर | VIDEO

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते दाखल

Ration Card KYC: घरबसल्या करा रेशन कार्ड केवायसी; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'या' कंपनीची स्थापना, IAS अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT