Shivsena Saam
महाराष्ट्र

Political Shifts: भाजपचा ठाकरेंना पुन्हा धक्का! कोकणातील प्रमुख नेते कमळ हाती घेणार

Thackeray faction leaders joining BJP: आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील प्रमुख नेते ठाकरेंची साथ सोडून भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे.

Bhagyashree Kamble

विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. महत्त्वाचे शिलेदार ठाकरेंची साथ सोडून महायुतीमध्ये सामील होत आहे. ठाकरेंना सर्वाधिक हादरे कोकणात बसत आहेत. राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता. आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजप ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील प्रमुख नेते ठाकरेंची साथ सोडून भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नेत्यांनी कंबर कसली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रत्येक नेता मैदानात उतरला आहे. कुठे फोडाफोडीचं राजकारण, तर कुठे स्वेच्छेने नेते पक्षप्रवेश करत आहेत. नुकतंच माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला होता.

राजन साळवी यांनी साथ सोडल्यानंतर मालवणमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार आहे. ठाकरे गटातील प्रमुख नेते भाजपच्या पक्षप्रवेशाच्या दिशेनं निघाले आहेत. माजी नगरसेवक मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतिन खोत, कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख शिल्पा खोत, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, समाजेवक भाई कासवकर भाजपात प्रवेश करणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या सोनम मस्करचा लक्षवेध, १० मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

SCROLL FOR NEXT