Shivsena-BJP Saam TV
महाराष्ट्र

'काँग्रेससारखी दयनीय अवस्था करुन घ्यायची नसेल तर शिवसेनेनं भाजपसोबत यावं'

'भाजप-सेनेने अडीच-अडीच वर्षांच्या समीकरणावर एकत्र यावं. याबद्दल खासदार संजय राऊतांना सुचना करणार.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : काल देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांच्या लागलेल्या निकालांवरती भाष्य करताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी नाशिकमध्ये शिवसेनेच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसंच शिवसेना भाजपसोबत (Shivsena-BJP) आली नाही तर तिची अवस्था काँग्रेससारखी (Congress) दयनीय होणार असून लोकसभा निवडणुकीत ३-४ जागा तरी निवडणूक येतील की नाही अशी शंका यावेळी यांनी व्यक्त केली.

आठवले म्हणाले, चार राज्यांमध्ये भाजपचा दणदणीत विजय झाला आहे या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा हात असून त्यांनी वेगवेगळ्या योजना आणल्या, तर उत्तर प्रदेशात योगींनी गुंडाराज संपवत विकासकाने केली आणि त्यामुळेच यूपीमध्ये भाजपचा विजय झाल्याचं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी पंजाबमधील निकालांबाबत ही भाष्य केलं, 'आम आदमी पक्षाला (AAP) सत्ता मिळाली त्याबद्दल आठवले यांनी केजरीवाल यांचे अभिनंदनही केले. पंजाबमधील लोकशाहीचा कल आम्हाला मान्य असून आत्ताची ही निवडणूक २०२४ च्या लोकभेची चाचणी होती. दोन वर्षांनी भाजपला ४०० च्या वर जागा मिळतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.

भाजप-सेनेने अडीच-अडीच वर्षांच्या समीकरणावर एकत्र यावं -

दरम्यान, आठवले यांनी काँग्रेसने युक्रेन (Ukraine) आणि पाकिस्तानच्या मुद्द्यावर सरकारच्या बाजूने उभे राहिले पाहिजे असा सल्ला दिला तर राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसला यश मिळणे अशक्य असून काँग्रेसला नव्या नेतृत्वाची गरज असल्याचं ते म्हणाले.

मात्र, त्यांनी यावेळी काँग्रेसला टोलाही लगावला नव्या नेतृत्वासाठी काँग्रेसमध्ये एकही सक्रिय नेता नाही त्यामुळे या पक्षाला भवितव्य नाही आणि शिवसेनेची (Shivsena) अवस्थासुद्धा काँग्रेससारखी होणार असून लोकसभेत ३-४ जागा येतील की नाही, याची शंका आहे. त्यामुळे भाजप-सेनेने अडीच-अडीच वर्षांच्या समीकरणावर एकत्र यावं. याबद्दल खासदार संजय राऊत भेटले, तर त्यांना सूचना करत असतो असही आठवले म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tilache Ladoo : हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा रेसिपी

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

Actress Assault: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत रेल्वे स्टेशनवर घृणास्पद कृत्य; दुःख व्यक्त करत म्हणाली, मला जीवन संपवावं...

Parbhani Accident: कीर्तनाहून येताना भयंकर अपघात, ३ वारकर्‍यांचा जागीच मृत्यू, दत्ता महाराज मुडेकरांचं निधन

SCROLL FOR NEXT