Sanjay Raut, Eknath Shinde, Devendra Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'त्या' प्रत्येकाचे राजकीय बॉम्ब फोडू; संजय राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

ल्या दोन दिवसांत आम्ही सरकारमधील तीन मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढली ती काय लवंगी फटाका आहेत का? असं म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रत्त्युतर दिलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut vs Eknath Shinde : गेल्या दोन दिवसांत आम्ही सरकारमधील तीन मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढली ती काय लवंगी फटाका आहेत का? असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रत्त्युतर दिलं आहे. इतकंच नाही तर, भष्ट मंत्र्यांमुळे संपूर्ण सरकार अडचणीत आहे, येत्या काही दिवसांत आणखी काही मंत्र्यांचे बॉम्ब फोडू, असा इशाराही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.  (Maharashtra Political News)

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्यासाठी संजय राऊत (Sanjay Raut) हे नागपुरात गेले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या लवंगी फटाक्याच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलं. आतापर्यंत तरी हे जे बॉम्ब, बॉम्ब म्हणताय ते लवंगी फटाके देखील नाहीत, असं फडणवीस म्हणाले होते.

संजय राऊत काय म्हणाले?

'कधीकाळी देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्षनेते होते. विधानसभेचा वापर त्यांनी भष्ट्राचाराविरोधात आवाज उठवण्यात केला होता. त्यांनी सरकारमधील मंत्र्यांची अनेक प्रकरणं बाहेर काढली आणि राजीनामा घेण्यासाठी दटून राहिले. आज सत्तेत बसल्यावर त्यांना भ्रष्टाचाराची प्रकरणं जी विरोधी पक्षाने काढली आहे ही त्यांना बॉम्ब न वाटता लवंगी फटाके वाटत आहे का?', असा सवाल राऊतांनी केला. (Latest Marathi News)

'अजून अधिवेशन संपलेलं नाही, आमच्यासाठी सीमाप्रश्नाचा ठराव हा अत्यंत महत्वाचा आहे. त्या प्रश्नामध्ये सीमाप्रश्नाचा ठराव वाहून जाऊ नये, म्हणून आम्ही गप्प आहोत, लवकरच सरकारच्या आणखी काही मंत्र्यांची बाहेर काढू, तेव्हा लवंगी फटाका आहे की बॉम्बस्फोट आहे, याचा निर्णय लवकरच लागेल', असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

'त्या प्रत्येकाचे बॉम्ब फुटणार'

फक्त एक-दोन नव्हे मंत्री नाही तर संपूर्ण सरकारच अडचणीत आहे. जे शिवसेनेतून फुटून गेलेले आहेत. आणि ज्यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत. त्या प्रत्येकांचं तुम्ही लवंगी फटाके म्हणा.. बॉम्ब म्हणा... लवकरच फुटतील, असा इशाराही खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT