Sanjay Politics Saam
महाराष्ट्र

Maharashtra Politics: फडणवीसांची चाकरी करा, शिंदेंना शाहांची तंबी; संजय राऊतांचा दावा, शिरसाटांचा प्रत्युत्तर

Sanjay Raut Alleges Amit Shah Warned Eknath Shinde Faction: संजय राऊत यांनी दावा केला की, गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना तंबी दिली आहे. यावर शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Bhagyashree Kamble

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर टीकेची तोफ डागली आहे. 'शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना गृहमंत्री अमित शाह यांनी तंबी दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चाकरी करा, नाहीतर सरकारमधून दूर व्हा. तुमच्याशिवाय हे सरकार चालू शकतं', अशी तंबी शाहांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे.

शंभूजेंवर टीका

'दिवंगत आनंद दिघे असताना संजय राऊत हे शिवसेनेत होते का? आनंद दिघेंनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी आम्हाला सांगू नये', असं शंभूराज देसाई म्हणाले होते. यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय, 'मग काँग्रेसमधून आलेले शंभूराज देसाई शिकवणार का?' असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

शिंदेंना शाहांकडून तंबी

तसेच गृहमंत्री अमित शाह यांनी शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना तंबी दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 'शिंदे गटाच्या पक्षप्रमुखांना अमित शाह यांनी तंबी दिलेली आहे. फडणवीस यांची चाकरी करा, नाहीतर सरकारमधून बाहेर पडा. तुमच्याशिवाय हे सरकार चालू शकतं. फार शहाणपणा करू नका', असं संजय राऊत म्हणालेत.

संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर

संजय राऊतांच्या तंबी मुद्द्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'संजय राऊत यांच्या कानात तंबी दिली होती का? तुम्ही केलेले कॉल अमित शाह उचलत नाही. अमित शाह शिंदे यांच्याबरोबर फोनवर काय बोलतात हे संजय राऊत यांना कसे माहित होते? लहान मुलेही म्हणतात की, संजय राऊत मूर्ख माणूस आहे. पक्ष कसा चालवता? तो सिल्वर ओकच्या कचरा कुंडीत ठेवलाय का, की राहुल गांधींच्या बेडरूममध्ये?' असं संजय शिरसाट म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Organize : स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्याचे ५ सर्वोत्तम मार्ग, जाणून घ्या

Aadhaar-Pan Linking: हे काम आताच करा, अन्यथा ३१ डिसेंबरला येणार नाही पगार

Mumbai–Pune Highway Accident : मित्रांसोबत लोणावळ्याला निघाला, पण वाटेत कुत्र्याने घात केला, मुंबई-पुणे हायवेवर तरूणाचा मृत्यू

Pawan Singh Wife: 'मी एक तुच्छ महिला...'; प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीने मागितली आर्थिक मदत, सोशल मीडियावर शेअर केला क्यूआर कोड

लाडकी बहिण योजनेसाठी ekyc कशी कराल ? कोणते कागदपत्रे लागतात?

SCROLL FOR NEXT