MP Shrikant Shinde  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिवसेनेचे आणखी आमदार फुटणार? श्रीकांत शिंदेंचं मोठं विधान

श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला.

साम टिव्ही ब्युरो

वाशिम : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि फडणवीस सरकार बनले आहे. 50 आमदार आणि 12 खासदार जेव्हा एकत्र येऊन उठाव करतात, तेव्हा ते गद्दार कसे? असा सवाल शिंदे गटातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित केला. अजूनही काही आमदार आमच्या संपर्कात असून ते लवकरच शिंदे गटात सामील होतील. असा खळबळजनक दावा सुद्धा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. (Shrikant Shinde Todays News)

खासदार श्रीकांत शिंदे आज वाशिममध्ये आहेत. शिंदे गटातील खासदार भावना गवळी आज वाशिममध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत. यावेळी श्रीकांत शिंदे, शहाजीबापू पाटील तसेच शिंदे गटातील अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवसातून 20 तास काम करत आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे निर्णय भरपाई डबल देण्याचं काम शिंदे साहेब करीत आहेत'. असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. (Eknath Shinde Todays News)

50 आमदार आणि 12 खासदार जेव्हा येतात तेव्हा ते गद्दार कसे? आणखी काही आमदार शिंदे गटात येणार असल्याचा दावाही त्यांनि केलाय. 'आज काही लोक महाराष्ट्रचा दौरा करीत आहेत, आम्हाला पदरात घ्या म्हणतात, असं म्हणत नाव न घेता त्यांनी आदित्य ठाकरे यांना टोलाही लगावला आहे.

'पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा कार्यकर्त्यांना वाटले होते, की आपले काम होतील मात्र निधी सर्व राष्ट्रवादीच्या लोकांना मिळाला. त्यामुळे आम्ही पुढचे अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार राहिलो असतो तर एकही कार्यकर्ता शिल्लक नसता आणि शिवसेना संपली असती त्यामुळं आम्ही उठाव केला' असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.

माझ्या वडिलांना रिक्षावाला मुख्यमंत्री झाला असे बोलतात मात्र शिंदे साहेबांनी कार्यकर्त्यांना वेळ दिला आणि संघटना वाढविली त्यामुळं शिवसेना मोठी झाली. ठाणे जिल्ह्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका पंचायत समित्या सर्व शिंदे साहेबांच्या आहेत. असा दावाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ajit Pawar : 'सोनं स्त्रियांनाच शोभून दिसतं'; पुण्यातल्या गोल्डमॅनना अजितदादांच्या कानपिचक्या, VIDEO

Pune Airport : पुण्यात एअर इंडियाच्या विमानात बिघाड? प्रवाशांना मनस्ताप, VIDEO

Bhandup Railway Station : मध्य रेल्वेवरील स्थानकावर अचानक बत्ती गुल; नेमकं काय घडलं? VIDEO

Health Tips: चपाती आणि भात खाल्ल्याने वजन वाढते का?

SCROLL FOR NEXT