रुपाली बडवे
Raj Thackeray News : शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकीय समीकरण बदललं आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर राज्यात बदलेल्या राजकीय समीकरणानंतर मंगळवारी मुंबईत मनसैनिकांना मेळाव्यात मार्गदर्शन केलं. राज्यातील राजकारणावर राज ठाकरे (Raj Thackeray) चौफेर फटकेबाजी केली.
'राज्यात ८ भारतरत्न आहेत. केवळ पुतळे उभे केल्यानं काय होतं ? केवळ जयंती आणि पुण्यतिथीला आठवण येते. आमचे महापुरूष आम्ही जातीत वाटून घेतले. प्रत्येक जण एकमेकांचे वाभाडे काढतो. खरंतर तुम्हाला वेगळे ठेवण्यासाठी हे सुरु आहे. खरंतर वारसा हा वस्तूचा नसतो, वारसा हा विचारांचा असतो, तो पुढे चालवायचा असतो. मला बाळासाहेबांचा वारसा पुढे न्यायचा आहे, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
शस्त्रक्रियेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी आज दादर येथील रवींद्र नाट्य मंदिरात राज्यातील मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचं आयोजन केलं. या मेळाव्यात त्यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसंच पक्षवाढीसाठी राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन केलं. राज्यात शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. या मेळाव्यात त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.
या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले, शस्त्रक्रियेनंतर आता सगळ ठीक आहे. आतामी पुण्यात एक दिवस जाऊन येणार आहे. नाशिकला जायचं आहे. तसा प्रवासात काही त्रास होत नाही. राज्यात काही महिन्यांपूर्वी झालं ते वाईट झालं. हे राज्याच्या इतिहासात कधीच झालं नाही. मी शिवसेना सोडताना बाळासाहेब ठाकरे यांना भेटून सांगितलं होतं. त्यांना सर्व माहित होतं'.
'मागील अडीच वर्षापासून राज्यात जे चालू आहे ते चांगलं नाही. २०१९ ला ज्यांनी मतदान केलं आहे, त्यांना कळत पण नाही की, आपण कोणाला मतदान केलं. कोण कोणामधून बाहेर आलं हे कळतं नाही आहे. हे राजकारण नसून तडजोड आहे, असेही ते म्हणाले.
'छगन भुजबळ, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना माझ्या बंडांशी करु नका, मी दगाफटका करुन, पाठीत खंजीर खूसपून बाहेर पडलो नाही, बाहेर पडल्यावर दुसऱ्या पक्षात गेलो नाही. तर मी कार्यकर्त्यांच्या विश्वासावर माझा नवा पक्ष उभा केला, असे राज ठाकरे म्हणाले.
तर मनसैनिकांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले, 'अत्यंत ताकदीने या निवडणूकीत उतरायचं आहे. निवडणुकीत तडजोड करू नका, लाचार होऊ नका. तुमची किंमत शून्य करून घेऊ नका. आपल्याकडून जो उभा राहील, त्याला ताकद द्या. शक्य होईल तेवढ्या सभा करेल. गणेशोत्सवानंतर मी दौरे करेल, सभा घेईल'.
राज ठाकरे यांनी भाजपच्या निलंबित प्रवत्या नुपूर शर्मा यांच्यावर देखील भाष्य केलं. राज ठाकरे म्हणाले, नुपूर शर्मा बोलल्या तेव्हा त्यांना पक्षातून काढून टाकलं. मी त्यांची बाजू घेतली. त्या उगाच बोलल्या नाहीत, जे आहे तेच त्या म्हणाल्या. झाकीर नाईक देखील तेच बोलतो. त्यांच्यावर कुणी काही बोलत नाही'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.