Shiv sena mla disqualification case clash between eknath shinde group and uddhav thackeray group lawyer  Saam TV
महाराष्ट्र

MLA Disqualification Case: ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये बाचाबाची; आमदार अपात्रतेच्या सुनावणीत काय घडलं?

Shivsena MLA Disqualification Case: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर गुरुवारी सुनावणी घेतली. या सुनावणीत शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला.

Satish Daud

Shivsena MLA Disqualification Case

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर गुरुवारी सुनावणी घेतली. या सुनावणीत शिंदे आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये जोरदार बाचबाची देखील झाली. शिंदे गटाकडून पुरावे सादर करण्यासाठी आणखी १४ दिवसांचा वेळ वाढवून मागण्यात आला. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे या सुनावणीत ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) वकिलांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच उद्देशून युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आमदार अपात्र प्रकरणात नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही, असं म्हणत ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

निर्णय घेताना पार्टी कुणाची आहे हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही, असं ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हटलं. यावर बोलताना मी कुणाचे ऐकायचे आहे. सुप्रीम कोर्टाचे ऐकायचे की स्वतःच्या अधिकारात निर्णय घ्यायचा? असा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केला.

दरम्यान, ठाकरे गटाचे वकील बोलत असताना शिंदे गटाच्या (Eknath Shinde) वकिलांकडून आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख नियुक्तीवर शिंदे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. २१ जून २०१८ रोजी झालेल्या कार्यकारणी बैठकीत ही निवड झाल्याचे सांगितले जात असले तरी त्यादिवशी अशी कुठलीही बैठक झाली नव्हती, असा दावा शिंदे गटाच्या वकिलांनी केला.

विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेल्या या सुनावणीत दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक सुद्धा झाली. ठाकरे गटाचे वकिल युक्तीवाद करत असताना शिंदे गटाच्या वकिलांनी खाली बसून कमेंट केली. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. यावरुन दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या वकिलांना ताकीद दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार...

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT