Sanjay Raut vs Raosaheb Danve
Sanjay Raut vs Raosaheb Danve Saam Tv
महाराष्ट्र

पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊत यांचा दानवेंना टोला

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : बाबरी मशीद (babari masjid) पाडत असताना तिथे दुर्बिणीने शोधून सुद्धा शिवसैनिक दिसला नाही, असं खोचक विधान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी बोलताना केलं होतं. दानवे यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी खरपूस समाचार घेतला. "दुर्बिणीने ते काय पाहतात ते पाहावं लागेल. त्यांच्याकडे दुर्बिण लावल्या म्हणूनच ते बाबरी पडत असताना पळून गेले आणि शिवसैनिकांनी (Shivsena) बाबरी पाडली असं सत्यकथन भाजपच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर पडलं. पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये", असा सणसणीत टोला संजय राऊत यांनी रावसाहेब दानवेंना लगावला आहे. मुंबईत ते पत्रकारांसोबत बोलत होते. (Sanjay Raut Latest News)

दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी काश्मीरमध्ये होत असलेल्या पंडितांच्या हत्यांवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. 370 कलमाचा विषय नाही. जम्मू-काश्मीर केंद्रशासित झाला म्हणून फरक पडला नाही. काश्मीरी पंडित रस्त्यावर उतरले आहेत. सामुदायिक स्थलांतर करण्याबाबत काश्मिरी पंडितांनी केंद्राला सूचना दिली आहे.

काश्मीरमध्ये जवान, काश्मिरी पंडित आणि अनेक मुस्लिम पोलीस मारले जात आहेत हे महत्त्वाचं आहे. या देशाची जे पोलीस सेवा करत आहेत, त्यांचं रक्षण केंद्र सरकार करू शकत नाही. सरकार पूर्णपणे फक्त निवडणुका आणि राजकारण यात गुंतून पडलं आहे. या सरकारला काश्मिरी पंडितांचा आक्रोश दिसत नाही हे दुर्देव आहे, अशी टीका राऊतांनी केली.

राऊतांचा दानवेंना टोला

यावेळी बोलताना संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना टोला लगावला आहे. "दुर्बिणीने ते काय पाहतात ते पाहावं लागेल. त्यांच्याकडे दुर्बिण लावल्या म्हणूनच ते बाबरी पडत असताना पळून गेले आणि शिवसैनिकांनी बाबरी पाडली असं सत्यकथन भाजपच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर पडलं. पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये", अशा शब्दात राऊतांनी दानवेंना सुनावलं आहे.

काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?

“बाबरी पाडताना मी स्वतः त्या ठिकाणी अयोध्येमध्ये होतो. दुर्बिणीने शोधून सुद्धा कुणी शिवसैनिक आम्हाला तिथे दिसला नाही. एखादा शिवसैनिक होता, तर त्याचा पुरावा त्यांनी दाखवावा. मी, गोपीनाथराव मुंडे आणि त्या काळातील अनेक भाजप नेते त्याठिकाणी होते. आता आम्ही केलेले श्रेय जर ते लाटत असतील, देशाची जनता त्यांना माफ करणार नाही.”, असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divorce over Kurkure: कुरकुऱ्यांमुळं संसारात किरकिर वाढली; बायको रुसली, पोलीस ठाण्यात बसली, म्हणतेय घटस्फोट हवाय!

Rakhi Sawant Hospitalized: राखी सावंतची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल

DC vs LSG : अभिषेक पोरेल आणि शे होप यांची तुफान फटकेबाजी; दिल्लीचं लखनऊसमोर २०९ धावांचं आव्हान

Mumbai News: मुंबईकरांचं मरण, होर्डिंगवरून राजकारण; भुजबळ ठाकरेंच्या पाठीशी, भाजप पडले तोंडघशी

Today's Marathi News Live : कल्याण लोकसभा मतदारसंघात अखिल भारतीय सेनेचा महायुतीला जाहीर पाठिंबा

SCROLL FOR NEXT