Ambadas Danve On Uddhav Thackeray Saam TV
महाराष्ट्र

Ambadas Danve: मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, ठाकरेंसोबतच राहणार; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण

Shivsena Ambadas Danve News: मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असून उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहणार आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

Ambadas Danve Latest News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. खरंच अंबादास दानवे ठाकरे गटाची साथ सोडणार का? असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र,अंबादास दानवे यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

"मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत एकनिष्ठ राहणार, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या ३० वर्षांपासून मी शिवसेनेचं काम करत आहे. काही गोष्टींमुळे माझी नाराजी आहे, पण माझ्या नाराजीचा अर्थ मी भाजपमध्ये जाणार असा होतो का?" असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे.

"अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांचं खंडन केलंय. मी शिवसेनेचा स्टार प्रचारक असून लोकसभेत मोठ्या संख्येने आमचे उमेदवार विजयी व्हावे यासाठी संपूर्ण राज्यात फिरणार आहे. मी अनेक गावात फिरुन आलो आहे. अजून बराच गावात मी जाऊन दौरा करणार आहे", असं अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटलं आहे.

"छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बसूनही आमचे काम होईल, अशी यंत्रणा आमच्याकडे आहे. चंद्रकांत खैरे यांच्यासोबत मी सुद्धा छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो. यासंदर्भात मी पक्षाकडे उमेदवारी देखील मागितली होती", असं अंबादास दानवे म्हणाले.

"पक्षाने आता खैरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने मी शिवसेनेसोबत एकनिष्ठ म्हणून काम करणार आहे, असंही दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात आम्ही शिवसेना पक्ष वाढीसाठी काम करणार आणि शिवसेनेचे सर्वाधिक उमेदवार निवडणून आणणार", असा विश्वासही दानवे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT