Shiv Sena CrisiS, Delhi High Court saam tv
महाराष्ट्र

Shiv Sena Crisis: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आज दिल्ली उच्च न्यायालयात हजर राहणार?

Shiv Sena CrisiS, Delhi High Court: उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावत १७ एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते.

Shivaji Kale

Shiv Sena Crisis: दिल्ली उच्च न्यायालयात आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात आज सुनावणी पार पडणार आहे. या प्रकरणी २८ मार्च रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आज ते कोर्टात हजर होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह सोशल मीडियावर केली जाणाऱ्या टीकेच्या संदर्भात ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर कोर्टात २८ मार्चला सुनावणी पार पडली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावत १७ एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते.

२ हजार कोटी रूपयांचा सौदा झाला, संजय राऊतांचा आरोप

शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड करत वेगळी भूमिका घेतली. यानतंर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव दिले. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी “शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी २ हजार कोटी रूपयांचा सौदा झाला होता. सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला. हा न्याय नाहीये, ही डील आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे,” असा आरोप केला होता.

या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान शेवाळे यांच्या वतीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच, गूगल, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदार यांच्यासंदर्भात केलेली बदनामीकारक वक्तव्य हटवण्याची मागणी करण्यात आली होती.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही वक्तव्ये तशीच असल्याने देखील नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणात सोशल मीडिया कंपन्याना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये तुमच्या प्लॅटफॉर्मवर अद्यापही या तिघांनी आमदार, खासदारांबाबत केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पोस्ट आहेत, त्या हटवण्यात का आलेल्या नाहीत? यासंदर्भात खुलासा करण्यास सांगितलं आहे. 

न्यायमूर्ती प्रतीक जालान यांनी हे आदेश दिले आहेत. राहुल रमेश शेवाळे यांच्या वतीने वरिष्ठ वकील राजीव नायर आणि अरविंद वर्मा, चिराग शाह आणि उत्सव त्रिवेदी यांनी न्यायालयात बाजू मांडली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: हिवाळ्यात मधुमेहावर 'ही' फळे, भाज्या गुणकारी

Rupali ganguli : अनुपमाच्या सेटवर दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू, रुपाली गांगुलीला गंभीर दुखापत

Maharashtra News Live Updates: सोलापूरमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगची तपासणी

Business Idea: पैशांसाठी सरकारी मदत घेऊन तुम्ही सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दर महिना होईल तगडी कमाई

VIDEO : शरद पवारांना परळीत जातीपातीचं राजकारण करायचंय, धनंजय मुंडेंचा नाव न घेता घणाघात

SCROLL FOR NEXT