Abdul Sattar vs Chandrakant Khaire Saam TV
महाराष्ट्र

Abdul Sattar : सत्तारांना येत्या निवडणुकीत सिल्लोडमध्ये.., चंद्रकांत खैरेंचं मोठं विधान

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी एक मोठं विधान केलं आहे. अब्दुल सत्तार यांना येत्या निवडणुकीत शिवसेना सिल्लोडमध्ये गाडून टाकेल, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. (Abdul Sattar News Today)

इतकंच नाही तर, सत्तार (Abdul Sattar) तोंडावाटे काहीही भुंकत असतात, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी देखील खैरे यांनी केली आहे. चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबादेत आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

अब्दुल सत्तार हे अधिकाऱ्यांना काहीही बोलता आहेत. ते मातोश्रीवर आणि आमच्या नेत्यांवरही टीका करत आहेत. मात्र, यापुढे जर त्यांनी मातोश्रीबाबत काही विधान केलं, तर आम्ही त्यांना जशाचं तसं उत्तर देऊ, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. (Abdul Sattar vs Chandrakant Khaire)

येत्या निवडणुकीत सिल्लोडमध्ये सत्तारांना शिवसेना पूर्णतः गाडून टाकेल, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. भाजपा हा शिस्तीचा पक्ष आहे, मग त्यांच्या पक्षासोबत सत्तेत असलेल्या सत्तारांची ही भाषा भाजपला चालते का? असा सवालही चंद्रकांत खैरेंनी उपस्थित केलाय.

'बेईमानी केली तर अशीच वेळ येणार'

अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात सुरू असलेल्या वादावर सुद्धा चंद्रकांत खैरैंनी प्रतिक्रिया दिली. ८ आमदार आमच्या संपर्कात आहे असं बच्चू कडू सांगतात, या लोकांनी मातोश्रीसोबत बेईमानी केली आहे. यांच्यावर अशीच वेळ येणार आहे. एक दिवस या मुख्यमंत्र्यांना डोक्याला हात लावून बसावं लागेल, माझे शब्द लक्षात ठेवा असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १४ लाख लाडकीला मिळतात फक्त ५०० रुपये; बहि‍णींचे ₹१००० का कापले?

Milk And Curd : दूध आणि दही एकत्र खातांय? होऊ शकतात या समस्या

Maharashtra Live News Update: भंडारा जिल्हा बँकेत नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव

Liver damage symptoms: पायांमधील 'हे' बदल सांगतायत लिव्हर खराब झालंय; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Kartoli Bhaji Recipe: श्रावणात करटोलीची भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT