अविनाश कानडजे
औरंगाबाद जिल्हा (Aurangabad) सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणूकीकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. निकालानंतर शिवसेना-भाजप युतीने विजय मिळवत युतीचा झेंडा फडकविला आहे. अब्दुल सत्तार आणि हरिभाऊ बागडे गटाने 14 पैकी 14 जागा जिंकत शिवसेना-भाजप गट विजयी झाला. तर विरोधी छुप्या कॉंग्रेस गटाचा सुफडासाफ झाला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले होते. राज्यातील सेना-भाजप युतीसाठी आग्रही असलेल्या अब्दुल सत्तार यांनी भाजपला (BJP) सोबत घेऊन दूध संघावर आपली सत्ता आणली आहे.
औरंगाबाद तालुका मतदार संघातून संघाचे अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या विरूद्ध कॉंग्रेसचे सुरेश पठाडे यांचा अर्ज कायम राहिल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत महिलांच्या राखीव मतदार संघातील दोन जागांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. आमदार हरिभाऊ बगाडे यांच्या पॅनलच्या अलका डोणगावकर आणि शीलाबाई कोळगे यांची लढत शारदा गीते आणि रुक्मिणीबाई सोनवणे यांच्यात झाली होती. महाराष्ट्रमध्ये भाजप सेना संघर्ष असला तरी औरंगाबादच्या दूध उत्पादक संघांमध्ये युतीने काम केले असल्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.